‘कथित’ शब्दाचा वाद, काँग्रेसच्या फजितीनंतर अय्यरांचा माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘कथित’ शब्दाचा वाद, काँग्रेसच्या फजितीनंतर अय्यरांचा माफीनामा; नेमकं काय घडलं?

Mani Shankar Aiyar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसची मोठी फसगत होते. याआधी त्यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्यामुळे भारताने त्यांचा आदर करायला हवा असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला चांगलेच अस्वस्थ केले होते. आता तर त्यांना चक्क माफीच मागावी लागली आहे. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. यासाठी अय्यर यांनी कथित हा शब्द वापरला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसनेही हात झटकले होते. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

‘भारताने पाकिस्तानला सन्मान द्यावा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब’ काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

अय्यर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस महासचिव जयराम रमेश म्हणाले, अय्यर यांनी या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांत माफी मागितली आहे. या वक्तव्यापासून काँग्रेस स्वतःला वेगळे ठेवते. यानंतर जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मे 2020 मध्ये चीनी घुसखोरीला क्लीनचिट दिल्याचा आरोप केला.

काय म्हणाले होते अय्यर?

फॉरेन कॉरस्पाँडंट क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मणिशंकर अय्यर भारत चीन युद्धाबाबत बोलताना दिसत आहेत. ऑक्टोबर 1962 मध्ये चीन्यांनी कथितपणे भारतावर आक्रमण केले असे त्यांनी म्हटले. यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर चांगलाच गदारोळ माजला. भाजप नेते काँग्रेसवर तुटून पडले. वाद वाढत असल्याचे पाहताच अय्यर यांनी या वक्तव्यावर माफी मागितली. आज सायंकाळी चीनी आक्रमणाच्या आधी मी चुकून कथित या शब्दाचा वापर केला. यासाठी मी पूर्णपणे माफी मागतो असे अय्यर म्हणाले.

भाजप नेते भडकले, काँग्रेसचा इतिहासच काढला

भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी अय्यर यांच्या या वक्तव्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीली. मणिशंकर अय्यर यांनी नेहरूज फर्स्ट रिक्रूट्स नावाच्या पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी बोलताना भारतावरील चीनी आक्रमणाला कथित म्हणून संबोधले. त्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे रिवीजनिज्मचा एक निर्लज्ज प्रयत्न आहे.

पंडित नेहरू यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनच्या बाजूने स्थायी सदस्यत्वाचा दावा सोडून दिला होता. तर राहुल गांधींनी सु्द्धा एका करारावर सही केली होती. राजीव गांधी फाउंडेशनने तर चीनी दूतावासाकडून पैसे घेतल आणि चीनी कंपन्यांना भारतातील प्रवेशासाठी शिफारस करत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. याच अहवालाच्या आधारावर सोनिया गांधींच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने चीनी सामानासाठी भारतीय मार्केट खुले करून दिले होते, असे आरोप मालवीय यांनी केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube