Congress : युवक काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ माजवणारे चार पदाधिकारी निलंबित
Congress : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये (Congress) चांगलंच अंतर्गत वाद सुरु आहे. अशातच युवक काँग्रेसचे ४ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. (Maharashtra Politics) मुंबई येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला आहे. यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याचा देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्षांनी राडा करणाऱ्या ४ पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
नेमकं काय घडलं?
प्रदेश उपाध्यक्ष तनवीर विद्रोही आणि सचिव इरशाद शेख यांचा निलंबित केले आहे. शनिवारी मुंबई येथे युवक काँग्रेसची कार्यकारिणी बैठक पार पडली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. तर काही कार्यकर्त्यांनी कुणाल राऊत यांना हटवण्याची मागणी करत होती. यामुळे खुर्च्यांची फेकाफेक करून मोठा राडा केला गेला आहे.
मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.वी. श्रीनिवास हेसुद्धा उपस्थित होते. नाराज होऊन ते तत्काळ दिल्लीला निघून गेले होते. या प्रकारानंतर ४ पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करून राडेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. तनवीर विद्रोही, इरशाद शेख यांच्यासह कराड दक्षिणचे अध्यक्ष दिग्विजय पाटील आणि प्रदेश सचिव उमेश पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. बी.वी. श्रीनिवास यांनी हे प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहे.