लोकसभा निवडणुकांसह पवार अन् ठाकरेंविषयी ज्योतिषी अनिल थत्ते यांचं मोठं भाकीत

लोकसभा निवडणुकांसह पवार अन् ठाकरेंविषयी ज्योतिषी अनिल थत्ते यांचं मोठं भाकीत

Astrologer Anil Thatte : प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते काय राजकारणावर बोलत असतात. त्यांनी यावेळीही असाच अंदाज वर्तवला आहे. इतकरच नाही तर लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha elections) कुणाला जागा मिळतील यापासून कुणाच सरकार बनेल आणि कोण बाहेर पडेल यावर ते बोलले आहेत. थत्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) मोठं भाकीत केलं आहे.

दोघेही बाहेर पडणार

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी काही ठिकाणी सभाही घेतल्या आहेत. पण लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडतील. फक्त राज ठाकरे हेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील महायुतीतून बाहेर पडणार, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे. त्याचबरोबर अजित पवारांना लोकसभेत एकही जागा मिळणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

पदवीधरच्यावेळीच फूट

राज ठाकरे यांचं आजपर्यंत कुणाशी पटलेलं नाही. त्यामुळे आताही यांच्याशी पटणार नाही. ठाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील राज ठाकरेंनी अभिजीत पानसेंना उभं केलं आहे. दोघेही माघार घेणार नाहीत. तिथंच महायुतीत फूट पडली आहे. लोकसभेसाठी मनसे महायुतीत राहील. त्यानंतर ते महायुतीत राहणार नाहीत, अशी भविष्यवाणी अनिल थत्ते यांनी वर्तवली आहे.

एनडीएला किती जागा मिळणार?

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. उर्वरित जागा महाविकास आघाडीला जातील, असं भाकीतही अनिल थत्ते यांनी वर्तवलं. त्याचबरोबर नरेंद्र मोदींना दोन तृतीयांश बहुमत मिळेल. 2029 ला पुन्हा तसच होई असेही वाटतं. 75 वय वगैरे सगळे इतरांकरता आहे. त्यांच्यासाठी नाही. 407 जागा मिळवण्यासाठी ते इतर पक्ष ही फोडू शकतात असंही ते म्हणाले आहेत. तसंच, देश हुकूमशाहीकडे जाईल असं मला वाटत नाही, असं अनिल थत्ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube