पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना जामीन, मुक्काम मात्र येरवड्यातच

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना जामीन, मुक्काम मात्र येरवड्यातच

Pune Accident News :  पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात एक मोठी समोर आली आहे. या बातमीनुसार या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन मिळाला आहे. विशाल अग्रवाल (Vishal Aggarwal) यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  न्यायालयात या प्रकरणी दहा दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती मात्र आज (21जून) विशाल अग्रवाल यांना न्यायालायने जामीन मंजूर केला आहे.

विशाल अग्रवाल यांना तीन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला असल्याची माहिती वकील ऍड. प्रशांत पाटील (Prashant Patil) यांनी दिली आहे. माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांना अल्पवयीन मुलाला ड्रायव्हिंग लायसन नसताना तसेच तो दारू प्यायलेला असतानाही कार चालवायला दिल्याच्या गुन्ह्यात  पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) जामीन मंजूर केला आहे. तर ड्रायव्हरचे अपहरण आणि धमकी तसेच रक्तगट नमुने फेरफार प्रकरणात आतापर्यंत निर्णय न झाल्याने विशाल अग्रवाल यांचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला हॉटेलमध्ये जाऊन मद्य पिण्याची परवानगी दिली होती. याच बरोबर जेव्हा अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता आणि त्यांचा फॅमिली ड्रायव्हर बाजूला बसला होता. मात्र जेव्हा अपघात झाला तेव्हा गाडी अल्पवयीन मुलगा नाहीतर मी गाडी चालवत होते असं पोलिसांना खोटं सांग असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितले होते.

त्यामुळे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या विरोधात कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता तसेच विशाल अग्रवाल यांनी Cctv मध्ये फेरफार केल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्यांनी अग्रवालच्या घरातील कॅमेरे ताब्यात घेत त्यांच्यावर कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले होते.

अर्थतज्ज्ञांचा सल्ला करदात्यांना झटका देणार?; अन्य करांसोबत रोबोट टॅक्सही घ्या; अर्थमंत्र्यांकडे मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज