सावरकरांविरोधात केलेलं वक्तव्य अंगलट? राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात (Swatantrya Veer Savarkar) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांना 19 ऑगस्ट रोजी पुणे न्यायालयात (Pune Sessions Court) हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी आज (दि. 30 मे) दिलेत.
विशाल अग्रवालला दणका! महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील…
लंडनमध्ये अनिवासी भारतीयांनासमोर दिलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख करताना आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळं सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग अक्षी जैन यांनी या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अन्वये सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पलिसांना दिले होते. त्यानंतर आता पोलिसांनी आपला तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याप्रकरण; छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा
पोलिसांनी सादर केलेल्या अहवालामध्ये राहुल गांधींच्या आक्षेपार्ह विधानाबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळं अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 204 अंतर्गत कारवाईसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील तारखेला पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पुण्याच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर आता राहुल गांधी स्वत: हजर राहणार की त्यांच्या वकिलामार्फत बाजू मांडतात, याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, सावरकरांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, मी माझ्या 5-6 मित्रांसोबत जात असताना एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती. असं केल्यानं मला आनंद झाला होता. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे खंडन केले होते.