Rahul Gandhi माफी मागा म्हणत सत्ताधारी-विरोधक भिडले; विधानसभेचे कामकाज तहकूब

Rahul Gandhi माफी मागा म्हणत सत्ताधारी-विरोधक भिडले; विधानसभेचे कामकाज तहकूब

Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याचे जोरदार पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी नेत्यांनी करत विधिमंडळात गोंधळ घातला. त्यानंतर या मुद्द्यावर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले आहे.

हे सुद्धा वाचा : Rahul Gandhi : निवडणुकांपूर्वीच काँग्रेसकडून कर्नाटकात आश्वासनांची खैरात; 2 वर्षांसाठी देणार इतका बेरोजगारी भत्ता

राहुल गांधी सातत्याने सावरकरांविरोधात वक्तव्ये करत असतात. माफीवीर म्हणून त्यांना काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने लक्ष्य केले जाते. याआधीही सत्ताधारी गटातील नेत्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज मात्र सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळ कामकाजा दरम्यान जोरदार गदारोळ घातला.

मोदी आडनावावर टीका करणं भोवलं; गुजरात कोर्टाकडून राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा

राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावकरांविरोधात अपमानजनक वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे या वक्तव्यांबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली. त्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकात गोंधळ वाढत गेला. कामकाज होईल असे दिसत  नसल्याने गोंधळ शांत करण्याच्या उद्देशाने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

विधिमंडळ अधिवेशनात आज मंत्र्यांच्या गैरहजेरीचाही मुद्दा चांगलाच गाजला. मंत्री वारंवार गैरहजर राहत असल्याने विरोधकांचा पारा चढला होता. त्यांनीही या मुद्द्यावर विधिमंडळात गोंधळ घातला. मंत्री दीपक केसरकर विधिमंडळाबाहेर भेटले पण सबागृहात हजर नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संताप झाला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube