रक्ताचे नमुने बदलले; शिवानी-विशाल अग्रवाल यांना पोलिस कोठडी!
Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणी (Pune Car Accident) अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agrwal) आणि वडिल विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर आज पुणे जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.
Raveena Tandon कडून कार अंगावर घालत वृद्ध महिलेला मारहाण; अभिनेत्री नशेत असल्याचा आरोप
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली होती. त्या प्रकरणात सध्या दोन डॉक्टर आणि एक शिपाई अटकेत आहेत. दरम्यान, रक्ताचे नमुने बदलले असले तरी ते कुणाचे आहेत याचा शोध घेतला असात ते एका महिलेचे आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेक वेग-वेगळ्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी मुलाच्या आईवर संशय आल्याने त्या दिशेने तपास सुरू झाला.
Exit Poll : PM मोदींचं स्वप्न होणार साकार, NDA 400 पार; ‘या’ एकाच एक्झिट पोलचा अंदाज
या काळात मुलाची आई शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेत अखेर पुणे पोलिसांनी अग्रवाल यांना अटक केली. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर घेण्यात आलेल्या रक्ताचा नमुना नेमका कोणाचा? याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु होती. अखेर अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचा नमुना आपलाच असल्याची कबुली पोलिसांना दिली.
पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी! आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना अखेर अटक
हा गंभीर अपघात झाल्यानंतर तीन दिवसांनीच एका तरुणाचं रॅप साँग मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. त्यावेळी हा व्हिडीओ सदर अल्पवयीन मुलाचा आहे हे समजून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग सुरु असतानाच शिवानी अग्रवाल कॅमेरासमोर आल्या आणि रॅप साँगमधला तो मुलगा माझा नाही असं सांगत ढसाढसा रडल्या होत्या. त्यावेळीही मुलाचे वडील, आजोबा चर्चेत असताना मुलाची आई म्हणजे शिवानी अग्रवालही मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर लगेच रक्ताचे नमुने बदलल्याचं प्रकरण समोर आलं होतं.
दुष्काळी भागात लाचखोर अभियंता; बीड पोलिसांनी जप्त केलं रोख रकमेसह दीड कोटींचं सोनं
पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मेच्या पहाटे अल्पवयीन आरोपीने मद्यधुंद अवस्थेत एका तरुण-तरुणीला कारने चिरडले. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीला तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांकडून संतापाची लाट उसळल्याचं दिसून आलं होतं.