पुणे अपघात प्रकरण ताजं असतानाच मद्यधुंद ‘CEO’चा प्रताप; दोन गाड्यांना उडवून ठोकली होती धूम

पुणे अपघात प्रकरण ताजं असतानाच मद्यधुंद ‘CEO’चा प्रताप; दोन गाड्यांना उडवून ठोकली होती धूम

Talegaon Dabhade CEO Drunk Driving :  पुण्यातील कल्याणीनगर भागात कार अपघाताची घटना ताजी असतानाच, आता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हिट अँन्ड रन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेगात स्कार्पीओ चालवून त्यांच्या गाडीने रस्त्यावरील दोन वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर ते पळून गेले होते. (Pune Accident) ही घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली आहे. (Drunk Driving ) दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करत तीन तासांच्या प्रयत्नानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेतलं आहे.

आम्ही लपवाछपवी करत नाही; अजित पवारांचं पुणे अपघात प्रकरणावर सडेतोड उत्तर

एन.के.पाटील हे कार चालवत घरी जात असताना तळेगाव स्टेशन परिसरात त्यांनी दोन कारला पाठीमागून जोरदार धक्का दिला. यावेळी सुदैवाने कारमध्ये कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, हा अपघात झाल्यानंतर यावेळी मुख्याधिकारी ए.के.पाटील पळून गेले. दरम्यान, हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावर यांनी सांगितल. तसंच, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर पाटील यांना विचारणा केली असता, त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हतं. त्यावेळी त्यांनी मद्य प्राशन केल्याचं निदर्शनास आलं.

या अपघाताबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर, उपनिरीक्षक संदेश इंगळे आणि इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवून पाटील यांना दार उघडण्यास भाग पाडलं आणि त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची पोसीस ठाण्यात चौकशी करत त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आलं. यावेळी पोलिसांनी पाटील यांच्याकडून जप्त केलेली स्कार्पीओ गाडी सोलापूर येथील एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube