Pune Car Accident : अंधारे, धंगेकरांची धडपड फक्त चमकोगिरीसाठी; शिंदेंचा नेता भडकला…

Pune Car Accident : अंधारे, धंगेकरांची धडपड फक्त चमकोगिरीसाठी; शिंदेंचा नेता भडकला…

Sanjay Shirsat News : आपला चेहरा अन् चमकोगिरीसाठी लोकं प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना लगावलायं. पुणे अपघात प्रकरणावरुन (Pune Car Accident) आमदार धंगेकरांसह सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांना चांगलच फैलावर घेतल्याचं दिसून आलं. त्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी त्यांचा चमकोगिरी असा उल्लेख केलायं. ते छत्रपती संभाजीनगरमधून बोलत होते.

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, हिट अँड रन प्रकरणात वेगवेगळे वळण येत आहेत. त्यामध्ये ज्या मुलाने दोघांना उडवले त्यांच्यावर कारवाई व्हावी, ही सर्वांचीच भूमिका आहे. या प्रकरणआवर राजकीय प्रतिक्रिया येतात, राजकीय तज्ज्ञांना आधी माहिती येते आणि नंतर पोलिसांना मिळत आहे. पोलीस, अधिकारी तसेच डॉक्टरांवरही विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राजकीय नेत्यांची जर न्याय देण्याची भूमिका असेल तर त्यांना काम करू द्यावे, आपला चेहरा आणि चमकोगिरी व्हावी म्हणूनच ते प्रयत्न करतात याचा मला संताप असल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.

तसेच आयुक्तालयाच्या समोर दुपारपर्यंत उपोषण करतात. कुणी बरीच यादी देतं, कुणी सबंध जोडण्याचे काम करतं. पोलिसांचा कसूर होत असेल त्यावर तुम्ही बोला, तुम्ही बिर्याणी का खाता याचे भांडवल हे नेते करत आहेत? नवीन गुन्हा दखल करण्याचा सरकारचा मानस असून या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली असल्याचं शिरसाट यांनी सांगितलंय.

2 तासांत 14 फोन अन् डॉक्टरनेच दिला रक्त बदलण्याचा सल्ला; ‘लाडल्या’ला वाचविण्यासाठी बापाची धडपड

ससूनचे डॉ. अजय तावरे यांना सहाव्या मजल्याचे संरक्षण हवे असेल तर त्यांना काही होणार नाही. एकीकडे आरोप करतात आणि दुसरीकडे संरक्षण मागता आणि नंतर राजकीय विषय करतात. मग तावरे असो किंवा बावरे असेल तर त्यांना सोडले जाणार नाही. दोषींवर कारवाई होणार असल्याचंही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.

जे बोलायचंय ते लेखी द्या : वडेट्टीवारांना सुनावलं!
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जे काही बोलायचं असेल त्यांनी लेखी स्वरुपात पोलीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावं, पण पोलिसांच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करु नये. या प्रकरणात कोणी असेल तर त्याबाबतचं उत्तर पोलिस आयुक्त देतील, असंही शिरसाट म्हणाले आहेत.


निकालाचा अन् घटनेचा काहीही संबंध नाही :

अपघाताच्या घटनेप्रकरणी निकालापर्यंत वाट पाहायची गरज नाही. निकालाच आणि घटनेचा काहीही संबंध नाही. तपास परिपूर्ण होणार असून घटनेचं गांभीर्य असेल तर सस्पेन्स ठेऊ नका. कुणाचा जीव घेणं सोपं नाही, हा महाराष्ट्र आहे. कुणी कुणाला अडचणीत आणत नाही असे राजकारण करत नाही. त्यांच्याकडे गृहखाते नाही तर आम्ही उद्धव ठाकरे गटाला देऊ, लंडनहुन आल्यावर त्यांना कोणते खाते हवे हे विचारू, असाही टोला संजय शिरसाट यांनी लगावलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज