‘पुण्यात निष्ठेची हत्या’; रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीवरुन ‘आबां’चं नाराजी नाट्य

‘पुण्यात निष्ठेची हत्या’; रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीवरुन ‘आबां’चं नाराजी नाट्य

Pune Loksabha : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) तारखा जाहीर होताच सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. पक्षांच्या या घोषणांमुळे उमेदवारी न मिळालेल्या इच्छूक उमेदवारांचं नाराजीनाट्य सुरु झालं आहे. याचंच उदाहरण पुणे लोकसभा निवडणुकीत दिसून आलं आहे. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचे नेते आबा बागुल (Aba Bagul) इच्छूक होते. मात्र, काँग्रेसने आमदार रविंद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) नावाने शिक्कामार्तब केल्याने आबा बागुलांकडून नाराजीचा सूर आवळण्यात आलायं.

उद्धव ठाकरेंना धक्का! माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात; शिर्डीत नवा डाव

रवींद्र धंगेकर लोकसभेची उमेदवारी होताचं काँग्रेस मध्ये नाराजी नाट्य दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते आणि सात वेळा नगरसेवक असलेले आबा बागुल यांचं व्हॉटसअप स्टेटस समोर आलं आहे. या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ‘पुण्यात निष्ठेची हत्या’ असा मजकूर आबा बागुलांकडून लिहिण्यात आला आहे.

नाराजीवर बोलताना आबा बागुल म्हणाले, मी कोणाच्याही चपला उचलणार नाही. राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही? मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असून लोकशाही मार्गाने काँग्रेभवनवर कँडल मार्च काढणार असल्याचं सांगताना आबा बागुल यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.

पुण्यात काँग्रेसकडून आबा बागुल होते निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून आबा बागुल पुण्यात काँग्रेसचे एक सक्रिय नेते आहेत. पुणे महापालिकेत अनेकदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आबा बागुल पुण्याचे महापौरदेखील आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात ‘मशाल’ पेटण्यापूर्वीच विझणार; पाटील, कदम अन् पवारांकडून ‘ठाकरेंचा’ करेक्ट कार्यक्रम

यंदा पक्षाने विचारपूर्वक उमेदवार देऊन पुणे लोकसभेची जागा काबिज करण्याचा आग्रह बागुल यांनी एका पत्राद्वारे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळवले होते. या पत्रामध्ये त्यांनी पुण्याचा खासदार कोण होणार? जनतेला कोण हवंय असा जनमताचा कौल घेण्याचं आवाहनही केलं होतं. मात्र, आबा बागुल यांच्या पत्राचा विचार न करता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

दरम्यान, आता आबा बागुल यांच्या नाराजीवर काँग्रेस पक्षाकडून कोणती भूमिका घेण्यात येईल. आमदार रविंद्र धंगेकर त्यांची नाराजी दूर करणार का? आबा बागुलांचं पुढचं कोणतं पाऊल असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube