Lok Sabha Election : जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार का? जरांगे पाटील म्हणाले…

  • Written By: Published:
Lok Sabha Election : जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार का? जरांगे पाटील म्हणाले…

Manoj Jarage Patil : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासााठी लढणारे मनोज जरांगे पाटील सध्या बीड येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशातच जरांगेंना महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लोकसभेची (Lok Sabha) उमेदवारी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांन केली. यावर मविआच्या नेत्यांकडून अने राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता मनोज जरागे पाटील (Manoj Jarage Patil) यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सोपा विषय : सुप्रीम कोर्टाचा ‘पतंजली’ला जबर दणका; रामदेव बाबांनाही झाप झाप झापलं, नेमकं प्रकरण काय? 

आज माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सध्या माझे संपूर्ण लक्ष मराठा आरक्षणावर आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. मराठ्यांची लेकरं-बाळ मोठी व्हावी, यासाठी माझा लढा चालू आहे. समाज ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. मी माझ्या समाजासाठी काम करत राहीन आणि लढत राहीन. दरम्यान, मनोज जरांगे यांनी यावेळी जाहीर कलं की, ते आणि त्यांचे सहकारी ३ मार्चपासून साखली उपोषण करणार करतील. पाटील यांनी ३ मार्च रोजी संपूर्ण राज्यात रास्ता रोकोचा इशारा दिला होता. पण, आता त्यांनी परीक्षेमुळे रास्ता रोको आंदोलन पुढे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोपा विषय : सुप्रीम कोर्टाचा ‘पतंजली’ला जबर दणका; रामदेव बाबांनाही झाप झाप झापलं, नेमकं प्रकरण काय? 

जरांगे पाटील यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. जरांगे म्हणाले, फडणवीसांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी लढत राहीन. तसेच, सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून मी मागे हटणार नाही. मराठा समाजाला OBC तून आरक्षण देण्यासाठी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल, आणि ते आम्ही सिद्ध केलं. तसेच शासकीय अहवाल देखील तेच सांगतोय. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मागे घ्या, असंही जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले, आम्ही दहा टक्के घ्यायला तयार आहोत, मात्र, ते आरक्षण ओबीसीतून द्या. सरकारने देऊ केलेलं १० टक्के स्वतंत्र आरक्षण मी स्वीकारावं यासाठी हे सरकार माझ्यामागे चौकशा लावल्या जात आहेत. परंतु, मी या गोष्टींना जुमानत नाही. आमच्या मुलांना केंद्रात सवलती मिळाल्या पाहिजे. माझा लढा फक्त मराठा समाजासाठी आहे आणि त्यांच्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहणार आहे. माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. सरकारने सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. सरकारने लोकांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नये.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज