बारामतीत पवारांनी सुरू केली पाहुणचाराची तयारी; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना जेवणाचं अवताण

बारामतीत पवारांनी सुरू केली पाहुणचाराची तयारी; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना जेवणाचं अवताण

Sharad Pawar : राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 2 मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी ज्या निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. त्यात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे यांची नावं आहेत. मात्र राज्यसभेचे खासदार असतानाही ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना शरद पवारांनी मात्र आपल्या स्टाईलमध्ये खास गुगली टाकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांना आपल्या घरी म्हणजेच गोविंदबागेत जेवणाचे आमंत्रण दिलं आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरात पहिल्यांदाच येत आहात. याचा मला आनंद होत आहे. गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आधीच आपल्याला सांगितलं आहे. नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांना या निमंत्रणाचा स्वीकार करावा असे या पत्रात शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पत्राचं कसं उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सोपा विषय : सुप्रीम कोर्टाचा ‘पतंजली’ला जबर दणका; रामदेव बाबांनाही झाप झाप झापलं, नेमकं प्रकरण काय?

या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी वेळ राखून ठेवला होता. मात्र, त्यांना सरकारकडून निमंत्रण मिळालं नाही. तरीदेखील शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणासाठी बोलावले आहे. आता त्यांच्या आमंत्रणावरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री खरंच जेवणासाठी जातात का याची उत्सुकता आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या कारभारावर खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारच्या 2015 मधील शासन निर्णयानुसार अशा कार्यक्रमांच्या वेळी स्थानिक लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचे नाव टाकावे लागते. मात्र असे का झाले याची माहिती आता प्रोटोकॉल विभागाला विचारावी लागेल. कारण  याचं उत्तर माझ्याकडे नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आघाडीचं जागावाटप ठरलं? ठाकरेंना 21 तर शरद पवारांना 11 जागा; फॉर्म्यूला काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज