आघाडीचं जागावाटप ठरलं? ठाकरेंना 21 तर शरद पवारांना 11 जागा; फॉर्म्यूला काय?

आघाडीचं जागावाटप ठरलं? ठाकरेंना 21 तर शरद पवारांना 11 जागा; फॉर्म्यूला काय?

Lok Sabha Election : शिवसेना उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर लढणार असल्याची (Lok Sabha Election) माहिती आहे. या 23 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा मिळतील अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाला 11 जागा मिळतील. जर वंचित बहुजन आघाडी सोबत असेल तर त्यांना अकोल्याची जागा सोडण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच आणखी एक ते दोन जागा वंचितला देण्यात येतील, हे जागावाटप महाविकास आघाडीचं आहे.  यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतून जागावाटपाचा असा फॉर्म्यूला समोर येत आहे.

मुंबईतील चार जागा लढण्यासाठी उद्धव ठाकरे गट इच्छुक आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात लढण्यास शरद पवार गट उत्सुक नाही. उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यात जे एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 23 जागांचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला होता. त्यांचा हा दावा कायम आहे. या 23 जागांपैकी 21 जागा ठाकरे गट लढणार आहे तर दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जातील असे सांगण्यात येत आहे.

‘आधी बारामती उरकतो मग पुणे..’ अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांनी मनावर घेतलं…

या दोनमधील एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी यांना देण्यात येईल. महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या पाठिंब्याने राजू शेट्टी ही जागा लढतील. तर दुसरी जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याची तयारी शिवसेनेची आहे.

यानंतर आघाडीतील दुसरा मोठा पक्ष काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळतील तसेच वंचित बहुजन आघाडीला अकोल्याची जागा सोडण्याची तयारी मित्रपक्षांची आहे. या व्यतिरिक्त वंचित आघाडीला आणखी एक ते दोन जागा मिळतील अशीही शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजले.

गडाखांच्या विरोधात भाजप भास्करगिरी महाराजांना मैदानात उतरविणार ? देवगड संस्थानचा थेट खुलासा

मु्ंबईचा विचार केला तर चार जागा ठाकरे गटाला मिळतील आणि दोन जागा काँग्रेसला मिळतील अशी शक्यता आहे. ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागा पाहिल्या तर यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई. उत्तर पश्चिम मुंबईसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष इच्छुक नाहीत. त्यामुळे ही जागा ठाकरे गट लढवण्याच्या तयारीत आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघ सध्या उद्धव ठाकरे गटाकडे आहे. परंतु, ही जागा काँग्रेसला दिली जाऊ शकते. काँग्रेसचा तसा आग्रह आहे. जर वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर ही जागा त्यांना दिली जाऊ शकते. कोल्हापुरच्या जागेसंदर्भात थोड्या अडचणी आहेत. सध्या हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. येथे विद्यमान खासदार आहे. परंतु, ही जागा काँग्रेसला हवी आहे. या जागेच्या बदल्यात शिवसेनेने काँग्रेसकडे सांगलीची जागा मागितली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube