‘आधी बारामती उरकतो मग पुणे..’ अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांनी मनावर घेतलं…
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांचं (Lok Sabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. यानंतर महायुतीत आपलं राजकारण सेट करत असतानाच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात (Supriya Sule) कोण असा प्रश्न विचारला जात असतानाच सुनेत्रा पवार यांचं (Sunetra Pawar) नाव पुढं आलं. आता बारामतीतून त्यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार पायाला भिंगरी लावून मतदारसंघांमध्ये फिरत आहेत.
आज अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा वाढदिवस असल्याने वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी तथा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. या भेटीगाठी दरम्यान जय पवार यांनी पुण्यातील भेटीगाठीबाबत बोलत असताना आधी बारामती उरकतो नंतर पुणे असं म्हणत बारामती किती गांभीर्याने घेतले हे दाखवून दिलं आहे.
Ajit Pawar : ‘मला फुकटचे सल्ले देऊ नका’ CM शिंदेंच्या अभिनंदनाच्या ‘गुगली’वर अजितदादा चिडलेच
दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर कुटुंबात आणि पक्षात मोठी फूट पडली आहे. यानंतर पवारांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना नमवण्यासाठी भाजप नेते अजितदादांच्या साथीने तयारीला लागले आहेत. पवारांचा पराभव करायचा असल्यास पवार कुटुंबातीलच उमेदवार असावा, असा आग्रह अनेक भाजप नेत्यांचा आहे. यामुळेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव समोर येत आहे. याआधी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ यांना मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उतरले होते मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या तर मावळची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता अजितदादांनी घेतलेली दिसतेय. याचीच परिणिती म्हणून पार्थ आणि जय पवार पायाला भिंगरी लावून मतदारसंघात बैठकांचा धडाका लावला आहे.
काही दिवसानंतर आचारसंहिता जाहीर होईल आणि महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण हे स्पष्ट होईल, मात्र बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांमध्ये सुनेत्रा पवारांना तिकीट मिळाल्यास ननंद भावजईमध्ये लढत झाल्यास ती देशभरात लक्षवेधी ठरेल यात मात्र शंका नाही.
Supriya Sule : बावनकुळेंच्या पोटातलं ओठांवर आलं ‘त्या’ वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी घेरलं