समावेश झाला, बैठका झाल्या पण जागावाटपाचं काय? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नियोजन

समावेश झाला, बैठका झाल्या पण जागावाटपाचं काय? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नियोजन

Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून विविध मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी आणि जागांची चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडी, इंडिया आघाडीत समावेश झाला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या महविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठकाही पार पडल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना जागावाटपाचं नियोजन सांगून टाकलं आहे.

The Crew: तब्बू, करीना अन् क्रिती एअर होस्टेसच्या लूकमध्ये; ‘द क्रू”या’ दिवशी होणार रिलीज?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसकडून काल पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत वंचितकडून सादर करण्यात आलेले 39 मुद्दे काँग्रेसकडून स्विकारण्यात आले आहेत. त्याबद्दल स्वागत आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये चर्चा झालेल्या समझोतांच्या जागांबद्दलची आम्हाला माहिती नाही. आमची तिन्ही पक्षाला विनंती आहे की, तुम्ही समझोताबद्दलच्या जागांबाबत आम्हाला लेखी पत्राद्वारे किंवा माध्यमांद्वारे कळवावे, त्यानंतर आम्ही जागावाटबाबत पुढील बैठकीत चर्चा करणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

Shaitan Trailer : अजय देवगणच्या शैतानचा काळजाचा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आम्ही जागा कोणत्या घेणार हे त्यांनी सांगितलेलं नाही. मात्र, जागांचा समझोता झालायं, असं विधान त्यांनी केलं आहे. समझोता झालेल्या जागा कोणत्या पक्षाला याची माहिती त्यांनी आम्हाला दिली नाही. जागावाटपावर बैठक लवकरच बोलवणार असल्याचं काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे. एकत्र येण्याच्या दृष्टीने आम्हाला ज्या जागा पाहिजेत त्या जागा कोणत्या पक्षाच्या कोट्यात गेल्या आहेत हे पाहता येईल. त्यानंतर त्या पक्षासोबत वाटाघाटी करता येणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, त्यांना धडा शिकवा; शरद पवारांचा वळसे पाटलांवर हल्लाबोल

तसेच समझोतांच्या जागांबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्हाला त्यावर पुढील बैठकीत चर्चा करता येईल, त्याचा आराखडाही घेता येईल, त्यामुळे आमची तिन्ही पक्षाला विनंती आहे की, तुम्ही समझोता झालेल्या जागांची माहिती कळवावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना केली आहे. त्यामुळे आता पुढील काळात महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंबेडकरांना माहिती देण्यात येणार का? माहिती दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर कोणत्या जागांवर दावा करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube