The Crew: तब्बू, करीना अन् क्रिती एअर होस्टेसच्या लूकमध्ये; ‘द क्रू”या’ दिवशी होणार रिलीज?

The Crew: तब्बू, करीना अन् क्रिती एअर होस्टेसच्या लूकमध्ये;  ‘द क्रू”या’ दिवशी होणार रिलीज?

Crew First Look poster: करीना कपूर खान (Kareena Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabu) यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘क्रू’बद्दल (Crew First Look) प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. (Social Media) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी आता निर्मात्यांनी तिन्ही अभिनेत्रींचे फर्स्ट लूक रिलीज केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)


‘द क्रू’ मधून करीना, तब्बू आणि क्रितीचा पहिला लुक: या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत, यामध्ये तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनन बेदम एअर होस्टेसच्या लूकमध्ये दिसत आहेत. करीना, तब्बू आणि क्रिती एअर होस्टेस लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहेत.

‘या’ दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार: राजेश ए कृष्णन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 29 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनिल कपूरची (Anil Kapoor) मुलगी रिया कपूर आणि लोकप्रिय चित्रपट निर्माती एकता कपूर बनवत आहेत.

चित्रपटाची कथा अशी असणार: या चित्रपटात तुम्हाला तीन एअर होस्टेसची कहाणी पाहायला मिळणार आहे. ज्यांना त्यांच्या आयुष्याचा खूप त्रास होतो. या तिघांनाही त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळं करायचं आहे पण ते पुन्हा पुन्हा त्याच परिस्थितीत येतात जिथून ते पळत असतात. हा सिनेमा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे, यामध्ये करीना, तब्बू आणि क्रिती आपल्या कॉमेडीने चाहत्यांना पोट धरून हसवताना दिसणार आहेत. या चित्रपटात दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो या तीन अभिनेत्रींसोबत मस्ती करताना दिसणार आहे.

श्रेयसने सांगितलं महेश मांजरेकरांसोबतच्या कामाबद्दलचं गुपित; म्हणाला, ‘प्रेक्षकांना कायम…’

चित्रपट टीझर: काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा छोटा टीझर प्रदर्शित झाला होता, यांच पार्श्वभूमीवर ‘चोली के पीचे क्या है’ हे सुपरहिट गाणे वाजत होते. चित्रपटाचा टीझर शेअर करताना बेबोने लिहिले होते की, ‘अपनी सीटबेल्ट बांध ले, अपने पॉपकॉर्न तैयार रखें और उसे सर्व करने के लिए भी तैयार हो जाओ..’ असे कॅप्शन दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज