‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट; रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

Jayanti 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, तो ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Jayanti 2

‘Jayanti 2’ to Unfold a Story of College-Level Discrimination; Engaging Trailer Launched on Social Media : अनेक कायदे, नियम असतानाही कॉलेजमध्ये रॅगिंग, भेदभावाच्या घटना घडतात. अनेकदा अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना जातीआधारित रॅगिंग, छळ-त्रासाला तोंड द्यावे लागते. आता ‘जयंती २’ या चित्रपटातून कॉलेजमधील रॅगिंग, भेदभावाची गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, या चित्रपटातून या गंभीर विषयाला वाचा फुटणार आहे. हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

‘200 मंडळांचा DJ ला नकार, पण एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलं’; मेधा कुलकर्णींचं वक्तव्य

चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल नावाच्या एका मुलीची गोष्ट ‘जयंती २’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचं स्वप्न पायलनं उराशी बाळगलं आहे. मात्र, कॉलेजमध्ये आल्यावर तिला रॅगिंगला सामोरं जावं लागतं. या त्रासाला केलेल्या विरोधातून एक संघर्ष उभा राहतो. त्यात पायलचं काय होतं? तिला न्याय मिळतो का? हे चित्रपटात मांडण्यात आलं आहे. मात्र, केवळ पायलची गोष्ट मांडण्यापुरताच हा चित्रपट मर्यादित नाही, तर या निमित्ताने कॉलेज प्रशासनाचा दृष्टिकोन, शिक्षक-विद्यार्थ्यांकडून मिळणारी वागणूक असे अनेक पदर ही कथा उलगडून दाखवते. आजच्या आधुनिक काळातही होत असलेला हा भेदभाव या चित्रपटातून भाष्य करतो आणि या भेदभावाविषयी नवे प्रश्न उपस्थित करतो.


शिंदेंकडे गुदगुली करण्याचे गुण, जरांगेंना 100 टक्के त्यांचाच पाठिंबा; सदावर्तेंचा पुन्हा गंभीर आरोप

‘जयंती २’ या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. ‘जयंती’ चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून पायल जाधव, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे , सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.

झी-गुगलची मोठी भागीदारी; टीव्ही मालिकांमध्ये प्रथमच एआय सर्चचं फिक्शन-आधारित एकीकरण

चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत प्रभावी आहे. पायलच्या वाट्याला येणारा भेदभाव, त्यातून उभ्या राहणाऱ्या संघर्षाची झलक या ट्रेलरमधून दिसते. त्यामुळेच चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ ह्या चित्रपटाने बरीच चर्चा घडवली होती. आता त्या पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील भेदभाव, त्यातील राजकारणाला ‘जयंती २’ या चित्रपटाने हात घातला आहे. उत्तम कथानकाला कसदार अभिनेत्यांची जोड मिळाली असल्यानं या चित्रपटाला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

follow us