Shaitan Trailer : अजय देवगणच्या शैतानचा काळजाचा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Shaitan Trailer : अजय देवगणच्या शैतानचा काळजाचा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Shaitan Trailer : अभिनेता अजय देवगणचा ‘शैतान’ ( Shaitan Trailer ) हा चित्रपट एका कौटुंबिक चित्रपटावर आधारित ‘शैतान’ हा चित्रपट येत्या 8 मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यासंदर्भात खुद्द अजय देवगनने ( Ajay Devgan ) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर आता ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Ramshi Shukla : पोलीस अधिकाऱ्यांचे निरोप समारंभ शुक्लांच्या रडारवर; सोहळे बंद करा अन्यथा कारवाईचा इशारा

या चित्रपटाचा ट्रेलर एका घरात बसलेल्या माणसापासून सुरू होतो. मोबाईल फोनची बॅटरी डेट झाल्याने फोन चार्जिंग साठी पंधरा मिनिटे मागणाऱ्या आर माधवनला अजय देवगन माणुसकीच्या नात्याने फोन चार्ज करण्याची मुभा देतो. मात्र त्याचवेळी ज्योतिकाला त्याच्यावर संशय येतो आणि अजय देवगनला त्याला घरातून निघून जाण्यास सांगते. अजय देवगन ज्यावेळी त्याला घराबाहेर जाण्यास सांगतो.

तेव्हा अजयची मुलगी माधवनच्या बाजूने उभी राहते आणि त्याला घरात थांबवण्यासाठी आग्रह धरते. इतकच नव्हे तर माधवन जसं सांगतो तसे ती मुलगी वागते. नेमकं माधवनने काय केले? अजय देवगन ज्योतिकावर कोणता बाका प्रसंग ओढावतो. त्यांची मुलगी माधवांचं कसं काय ऐकते? असा सगळा थरार या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय.

या पुरस्कारासाठी अत्यंत कृतज्ञ; दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राणी मुखर्जीने व्यक्त केल्या भावना

दरम्यान, येत्या 8 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीलाल येणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन, ज्योती देशपांडे, अभिषेक पाठक यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दृश्यम आणि दृश्यम 2 नंतर आता अजय देवगन पुन्हा एकदा एका कौटुंबिक गोष्टीवर आधारित चित्रपट घेऊन येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube