अजय देवगणचा ‘शैतान’ लवकरच चित्रपटगृहात; चित्रपटाचं नवं पोस्टर

अजय देवगणचा ‘शैतान’ लवकरच चित्रपटगृहात; चित्रपटाचं नवं पोस्टर

Shaitan Movie : अभिनेता अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर आता नवीन पोस्टर समोर आलं आहे. एका कौटुंबिक चित्रपटावर आधारित ‘शैतान’ हा चित्रपट येत्या 8 मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यासंदर्भात खुद्द अजय देवगनने (Ajay Devgan) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर आता नवीन पोस्टर आणि रिलीज डेट समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

मागील काही दिवसांपूर्वीच अजय देवगणच्या शैतान चित्रपटाचा ट्रेलर समोर आला. चित्रपटात अजय देवगणसोबत इतरही कलाकार पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचं नवीन पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये अजय देवगन ढासू लूकमध्ये दिसत आहे, तसेच “जब बात परिवार पर आए तो वह हर शैतान से लड जाएगा” असं कॅप्शन अजय देवगणने कॅप्शनही दिले आहे.

CM शिंदेंच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा साजरा; छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला परिसर, शिवभक्तांची अलोट गर्दी

अजय देवगनच्या या पोस्टरमध्ये अभिनेत्याच्या डोळ्यात शैतानची भीती स्पष्टपणे दिसून येत असून हा एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात आर माधवन हा खलनायकच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

‘हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् या वरळीत आमच्यासमोर’; शेलारांचं आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज

दरम्यान, येत्या 8 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीलाल येणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगन, ज्योती देशपांडे, अभिषेक पाठक यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दृश्यम आणि दृश्यम 2 नंतर आता अजय देवगन पुन्हा एकदा एका कौटुंबिक गोष्टीवर आधारित चित्रपट घेऊन येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube