‘शेर बनकर दहाड़ेगा बाजीराव…’; ‘Singham 3’ सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक रिलीज

‘शेर बनकर दहाड़ेगा बाजीराव…’; ‘Singham 3’ सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक रिलीज

Singham Again: अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातून बाजीराव सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगनचा चित्रपटातील पहिला लूक समोर लूक समोर आला आहे. चाहते ‘सिंघम अगेन’ (Singham 3) मधील अजय देवगनचा लूकची वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली असून रोहित शेट्टीने (Rohit Shetty) अंगावर शहारे आणणारा अजयचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)


अजय देवगणचा लूक शेअर करताना रोहित शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तो पराक्रमी आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, तो खतरा आहे, तो ताकद आहे..सिंघम पुन्हा येतोय”. सगळ्यांचा आवडता पोलिस. बाजीराव सिंघम परत आला आहे.

सिंघम अगेनमधील अजय देवगणचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांची आणखीनच उत्सुकता वाढवली आहे. रोहित शेट्टीच्या शेअर केलेल्या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहे. एका यूजरने लिहिले की, सुपर सर….फायर इमोजी देखील पोस्ट केले. तर दुसर्‍याने यूजरने लिहिले आहे की,आता प्रतीक्षा करू शकत नाही.

सिंघम अगेनचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगनाच्या भूमिकेला चाहत्यांनी कायम पसंती दर्शवली आहे.

Samsara Movie: ‘काहे दिया परदेस’नंतर सायली अन् ऋषी सक्सेना पुन्हा दिसणार एकत्र

या चित्रपटात अजय देवगणसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजयने नुकताच करिनाचा लूक शेअर केला होता. फोटो शेअर करताना अजयने लिहीले होते- भयंकर, मजबूत आणि सिंघमची ताकद. अवनी सिंघम. फोटोमध्ये करीना हातात बंदूक दाखवताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा बघायला मिळालेल्या आहेत. या चित्रपटात करिनाशिवाय दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ देखील दिसणार आहेत. सिंघम अगेनच्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube