Dhamaal 4 ची ब्लॉकबस्टर घोडदौड सुरूच; 150 कोटींच्या दिशेने वाटचाल!

Dhamaal 4 : 'धमाल 4'ची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. 11 व्या दिवसाअखेरीस भारतातील निव्वळ (नेट) कमाई

Dhamaal 4

Dhamaal 4 : ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. 11 व्या दिवसाअखेरीस भारतातील निव्वळ (नेट) कमाई 134.10 कोटींवर पोहोचल्यानंतर, मंगळवारी तिकिटांच्या दरात सवलत देणाऱ्या ऑफरचा या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाला फायदा झाला. परिणामी प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रेक्षकांच्या संख्येत वाढ दिसून आली. 12 व्या दिवशी चित्रपटाने भारतात 4.42 कोटींची निव्वळ कमाई केली, ज्यामुळे त्याची एकूण भारतीय निव्वळ कमाई 138.52 कोटी झाली आहे.

दुसऱ्या मंगळवारीही प्रेक्षकांच्या संख्येत झालेली ही वाढ, प्रदर्शनापासूनच या फ्रँचायझीला प्रेक्षकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवते. दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा वेग स्थिर राहिल्यामुळे, ‘धमाल 4’ आता बॉक्स ऑफिसवर भारतातील निव्वळ कमाईचा 150 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. खजिन्याच्या शोधावर आधारित हा अत्यंत धम्माल कौटुंबिक साहसी चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.

… तर भाजपच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही; जंतरमंतरवरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

follow us