सनी देओल आणि अजय देवगणसोबत माधुरीनं एकत्र केला होता डान्स, फराह खान म्हणाली, ‘तुला तर अवॉर्ड मिळायला हवा’

माधुरी दीक्षितसमोर फराह खान हॉट सीटवर बसणार असून, या विशेष भागात बॉलिवूडमधल्या डान्सच्या अनेक गमतीशीर आठवणींना उजाळा मिळणार आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 14T172033.663

Madhuri had danced together with Sunny Deol and Ajay Devgn : ‘कोण होणार करोडपती’च्या येत्या भागात माधुरी दीक्षितसमोर फराह खान हॉट सीटवर बसणार असून, या विशेष भागात बॉलिवूडमधल्या डान्सच्या अनेक गमतीशीर आठवणींना उजाळा मिळणार आहे. ओम शांती ओममधल्या गाजलेल्या डान्स सिक्वेन्स पासून करण जोहरच्या मुंबईतील स्थानकांच्या गमतीशीर उच्चारांपर्यंत अनेक गमती जमती ऐकायला मिळणार आहेत.

यावेळी झालेल्या गप्पांमध्ये ‘ये रास्ते हैं प्यार के’ या चित्रपटात सनी देओल आणि अजय देवगण या दोघांसोबत डान्स केल्याची आठवण माधुरी दीक्षितनं फराहला सांगितली आणि फराहनं लगेचच तिची फिरकी घेत म्हटलं. ‘तुला तर पदक द्यायला हवं! कोरिओग्राफी विभागातर्फे तुला पुरस्कार मिळायला हवाय’ आणि मंचावर एकच हास्यकल्लोळ उठला.

या भागात पूर्वीच्या आणि आताच्या अभिनेत्यांच्या नृत्यशैलींबद्दल बोलताना फराह म्हणाली, ‘आता कमी-अधिक प्रमाणात सगळ्याच अभिनेत्यांना नाचता येतं. तेव्हा गोविंदा आणि अक्षय कुमार हे दोघेच नाचायचे.’ त्यावरून जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि सनी देओल यांच्या खास नृत्यशैलींचीही चर्चा या गप्पांमध्ये झाली.

यंदाचा उन्हाळा होणार अधिक कडक! मार्च 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता

फराहनं माधुरीला विचारलं, ‘तू सनी देओलसोबतही नाचली आहेस?’ त्यावेळी माधुरी म्हणाली, ‘मी सनी देओल आणि अजय देवगण या दोघांसोबतही नाचले आहे.’ माधुरीचं उत्तर ऐकून तिला पदक द्यायला हवं, अशी गंमत करणाऱ्या फराहनं लगेच पुढचा प्रश्न केला, ‘मग त्यांनी तुझ्या पायावर किती वेळा पाय दिला?’ त्यावर माधुरीनंही हसत उत्तर दिलं, ‘सुदैवानं आमच्यात थोडं अंतर होतं, त्यामुळे फारसा त्रास झाला नाही.’

गप्पांच्या ओघात माधुरीनं फराहला विचारलं, ‘एखाद्या कलाकाराला डान्सच्या स्टेप्स शिकवताना तुला कधी खूप कसरत करावी लागली आहे का?’ त्यावर फराहनं शाहरुख खानची आठवण सांगितली. ‘कधी कधी मी शाहरुखला एखादी अवघड स्टेप देते. तो कधीच नाही म्हणत नाही. “ठीक आहे, करतो,” असं म्हणतो. मग तो ती स्टेप इतकी वाईट करतो की म्हणते, “जरा थांब, मीच स्टेप बदलते.”

अशाच अनेक मनमोकळ्या गप्पा कोण होणार करोडपतीच्या सोमवारच्या भागात पाहायला मिळणार आहेत. तेव्हा, माधुरी आणि फराहच्या अशा धमाकेदार गप्पा पाहण्यासाठी ‘कोण होणार करोडपती’चा सोमवारचा हा विशेष भाग सोडू नका, रात्री ९ वाजता, सोनी मराठी आणि सोनी लिववर.

follow us