2 तासांत 14 फोन अन् डॉक्टरनेच दिला रक्त बदलण्याचा सल्ला; ‘लाडल्या’ला वाचविण्यासाठी बापाची धडपड
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Accident) आरोपी विशाल अग्रवाल (Vishal Agrwal) आणि ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे (Ajay Taware) यांच्यात दोन तासांत 14 व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून संभाषण झालं असल्याची माहिती सीडीआरमधून समोर आलीयं. या संभाषणादरम्यान, डॉ. तावरे यांनीच विशाल अग्रवाल यांना ब्लड बदलण्याबाबतचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आलीयं. दरम्यान, अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलल्याचा आरोप डॉ. अजय तावरे यांच्यावर ठेवण्यात आलायं. या प्रकरणी डॉ. अजय तावरे यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
आदित्य ठाकरे लंडनमधून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का? आशिष शेलारांची खरमरीत टीका
डॉ. अजय तावरेंचाच मुख्य प्लॅन होता :
डॉ. अजय तावरे याचाच ब्लड रिपोर्ट बदल्याण्याचा मुख्य प्लॅन होता, अशी माहितीही समोर आलीयं. डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप कॉल झाला. संशय येऊ नये म्हणून नॉर्मल फोन कॉल न करता व्हॉट्सॲपचा वापर करण्यात आला. डॉ. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप वरून संभाषण झालं आहे. दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ वरून समोर आले आहे.
अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना गुन्हे शाखेने अटक केलीयं. संबंधित अल्पवयीन मुलगा अपघातावेळी दारु प्यायला होता की नव्हता याबाबतचा उलगडा या रिपोर्टमधून होणार होता.
या अपघात प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर हा तपास येरवडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला. सध्या अल्पवयीन मुलगा बालसुधार गृहात आहे. तर त्याचे वडील आणि विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनाही अटक केलीयं. कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर आता संबंधित मुलाच्या रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपात दोन डॉक्टरांनाही अटक केली.
ब्लड रिपोर्ट बदलण्याचा डॉ. तावरेंचाच सल्ला :
अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलण्याबाबतचा सल्ला डॉ. अजय तावरे यांनीच विशाल अग्रवालला दिला असल्याची माहितीही समोर आलीय. हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पल संकलनादरम्यान सुमारे दोन तासांत 14 वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलले असल्याची माहिती पोलिसांनी दिलीयं.
पुण्यात चाललय काय? विद्यापिठात सापडला गांजा, प्रशासनात भाजपचे लोक; धंगेकरांचा आरोप
अपघात घडल्यानंतर अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टसंदर्भात फेरबदल करण्यासाठी मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांना फोन केला असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला होता. अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं ससून रुग्णालयात मेडिकल करण्यात आलं. यावेळी त्याने मद्य प्राशन केले की नाही? याचीही तपासणी करण्यात आली होती. मात्र, डॉक्टरांनी त्याचे ब्लड सॅंपल कचऱ्याच्या डब्यात टाकून तो दारु पिलेला नसल्याचा अहवाल दिला असल्याचा आरोप करण्यात आलायं.
मात्र, अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांच्या तपासात अल्पवयीन मुलगा दोन ठिकाणच्या बारमध्ये मद्य पित असल्याचं समोर आलं. अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर ब्लड रिपोर्टमध्ये त्याने मद्य प्राशन केलं नसल्याचं समोर आल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांना अटक केली.
दरम्यान, ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समाेर येत आहेत.