सुषमा अंधारेंचा बाळासाहेबांबाबतचा जुना ‘तो’ व्हिडिओ लावत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर तुटून पडले !

  • Written By: Published:
सुषमा अंधारेंचा बाळासाहेबांबाबतचा जुना ‘तो’ व्हिडिओ लावत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर तुटून पडले !

Raj Thackeray Public Meeting Thane: मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यात शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तुम्ही म्हणता वडिल चोरले. शरद पवार व काँग्रेसने शिवसेना फोडली होती. तेव्हा आजच्या कुठे टाहो फोडताना दिसले नाही, असा टोलाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांना लगावला आहे.

मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? मनोज जरांगे

सुषमा अंधारे या बाळासाहेब ठाकरेंबाबत बोललेला एक जुना एक व्हिडिओ राज ठाकरे यांनी सभेत दाखविला. त्यात सुषमा अंधारे म्हणतात की शालिनी पाटील, बाळासाहेब ठाकरे या 80 ते 85 वर्षांच्या म्हाताऱ्यांच्या थरथरत्या हातामध्ये तलवारी देऊन का उपयोग होणार आहे. तरणीबांड पोरं गोट्या खेळालला गेली आहेत का, त्याच्यावर अग्रलेख होत नाही का? बाळासाहेब ठाकरेंना म्हातारा बोलणाऱ्यांना तुमच्या पक्षाची प्रवक्त्या करता आणि तुम्ही वडिलांवर प्रेम आहे, असे सांगता असे ठाकरे म्हणाले.

मतदानाच्या एक दिवस अगोदरच वातावरण तापलं! अहमदनगरमध्ये दोन गटांत राडा

एकमेंकाकडे बघा जरा काय उद्योग करता

वडिल चोरले, आमच्या पक्ष फोडला आहे, असे सांगता. आता कोणत्या आघाडीत बसला आहेत. एकमेंकाकडे बघा जरा आपण काय उद्योग केले आहेत. उद्धव ठाकरेंनी मनसेचे सहा नगरसेवक खोके देऊन फोडले. तेव्हा काही नाही वाटले. नगरसेवक मागितले असते दिले असते. तुम्ही शरद पवारांबरोबर बसले आहात. शरद पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली आणि त्यानंतर पुलोद सरकार स्थापन केले आहे. पहिल्यांदा फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनी सुरू केली आहे. त्यानंतर 1991 मध्ये पवार यांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडली आहे. आमदार फोडणाचे काम शरद पवारांनी केले आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसला बरोबर घेत शिवसेना फोडली. भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला होतात. तेव्हा वाईट नाही वाटले. आता कसल्या फोडाफोडीचे राजकारण सांगत आहात. माझा बाहेरून पाठिंबा आहे, मी काय बोलू शकतो, आपल्याला थोडा अजून फेव्हिकॉल लागला आहे, असा मिश्किल टोलाही राज ठाकर यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज