आता थेट रस्त्यावर उतरावं लागणार; मी तुमच्या सोबत, प्रकाश आंबेडकरांचा हाकेंना भर सभेत फोन

Prakash Ambedkar on OBC : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केल. त्यानंतर सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य करत जीआर काढले आहेत. दरम्यान, त्यामध्ये हैदराबात गॅझेटचा एक जीआर आहे. त्या जीआरवरून आता ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभारा राहिला आहे. या जीआरमुळे सर्व ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. आज बारामतीत ओबीसी बहुजन एल्गाल मोर्चा आयोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये प्रकाश आंबेडकही फोनवरून उपस्थितांशी बोलले.
या सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे ते फसवणूक करणार आहे (OBC) आणि ते ओढून ताणून दिलेलं आरक्षण आहे. त्यामुळे आता आपल्याला सर्वांना मिळून न्यायालयात, रस्त्यावर आणि आंदोलनाच्या माध्यमातून लढाई लढावी लागणार आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मण हाके यांच्यासर इतर ओबीसी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी हाके यांचं भाषण सुरू असताना फोन केला होता. त्यांनी उपस्थित नागरिकांशी फोनवरूनच संवाद साधला.
जरांगे नावाचा माणूस पवारांनीच उभा केला,बारामतीत एल्गार मोर्चातून लक्ष्मण हाकेंचा थेट घणाघात
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नुकतेचं मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानांवर आंदोलन झाले. बात मराठ्यांना काय मिळालं? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला माझा पांठिबा आहे. परंतु त्यांनी जी मागणी केली की मराठ्यांना OBC तून आरक्षण द्या. या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं? कारण मराठवाडाच्या काही जिल्ह्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यात अर्थातचं काही त्रुट्या आहेत. परंतु ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना लाभ नक्कीचं मिळावा.
कागदपत्राची पूर्तता करण्यात या लाभाचा टक्का निश्चितच घसरणार यात मात्र शंका नाही. उर्वरित अंदाजे 2.50 करोड मराठ्याचं काय आहे? असा प्रश्न मराठ्यांना सतावतो आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझे व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनचं सरसकट आरक्षण मिळावे जेणेकरून हा पेच निर्माण होणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनचं “मराठा आरक्षणाचा” फायदा होईल. मराठ्यांना मराठा म्हणूनचं सरसकट आरक्षण कृपया द्यावे. जेणेकरून 58 लाख कुणबी नोंदीवाले मराठे + उर्वरित 2.50 करोड मराठ्यांना ‘मराठा आरक्षणाचा’ फायदा होईल. माझी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की, मराठ्याचं नुकसान कृपया हो देऊ नका.