Parliament Session : ‘जया अमिताभ बच्चन’ उच्चारावरुन खडाजंगी; विरोधकांकडून सभात्याग

Parliament Session : ‘जया अमिताभ बच्चन’ उच्चारावरुन खडाजंगी; विरोधकांकडून सभात्याग

Parliament Session : ससंदीय कामकाज (Parliament Session) सुरु असतानाच चर्चेसाठी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bacchan) यांचा उल्लेख करताना सभापती जगदीप धनखड (Jagdip Dhankhad) यांनी जया अमिताभ बच्चन असा उच्चार केला. धनखड यांच्या उच्चारानंतर जया बच्चन यांनी आक्षेप नोंदवलायं. मला सभापतींचा बोलण्याचा टोन आवडला नसल्याचं म्हणत बच्चन यांनी आक्षेप घेतलायं. यावेळी सभागृहात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडल्याचं पाहायला मिळालं होतं. सभागृहात विरोधकांकडून वॉकआऊट करीत सभात्याग करण्यात आला.

वसंतदादा पाटील यांच्यानंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता म्हणजे अजितदादा पवार – सुनिल तटकरे

संसदेत राज्यसभेच्या कामकाजादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखर यांच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला. जया बच्चन म्हणाल्या की, मी एक कलाकार आहे. मला देहबोली समजते. मला अभिव्यक्ती समजते. मला माफ करा पण तुमचा टोन योग्य नाही. हे मान्य नाही. जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर सभापती चांगलेच संतापल्याचं दिसून आले. यादरम्यान, राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला आणि विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी विरोधी सदस्यांनी ‘दादागिरी चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या.

महायुतीत ट्विस्ट! निवडणुकीआधीच वेगळ्या वाटा, आज ‘या’ नेत्याकडून नव्या आघाडीची घोषणा?

जया बच्चन यांनी आक्षेप घेतल्यानंतर तत्काळ सभापती यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, माझ्याकडे माझी स्क्रिप्ट आहे विरोधक घोषणाबाजी करत सभागृहातून बाहेर पडले आहेत. विरोधक चर्चेत सहभाग इच्छित नाहीत. ते आपल्या कर्तव्यातून ाहेर पडत आहेत. यावेळी बोलताना सभापतींनी भारत छोडो आंदोलनावरही भाष्य करीत विरोधकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तसेच देशातील जनता विकास पाहत असून आम्ही विकासाच्या यात्रेवर आहोत. मी या व्यासपीठाचा वापर जबाबदारीने करीत आहे. भारत हा शांतीचा देश आहे भारतात सलग तिसऱ्यांदा मोदी सरकारने इतिहास रचला आहे. बच्चन यांच्याबाबत नावलौकिक असून मी फिल्मचा डायरेक्टर नाही, या शब्दांत जया बच्चन यांना सुनावलंय.

संतापाच्या भरात बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली, छ. संभाजीनगरची घटना

दरम्यान, जया बच्चन यांच्या वक्तव्यावर आणि विरोधकांच्या मागण्यांवर सभापती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केल्यावर राज्यसभेत तीव्र विरोध झाल्याचं दिसून आलं. सभापती म्हणाले, तुम्हाला संपूर्ण देश अस्थिर करायचा आहे, “खर्गे, हे सभागृह अशांततेचे केंद्र बनू देण्यात मी सहभागी होणार नाही. संविधानाच्या किंमतीवर तुमचा मार्ग काढण्याचा तुमचा निर्धार असल्याचं धनखड म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube