राहुल गांधींवर गैरवर्तनाचा आरोप; भाजप खासदार फांगनोन कोन्याक आहेत कोण?

राहुल गांधींवर गैरवर्तनाचा आरोप; भाजप खासदार फांगनोन कोन्याक आहेत कोण?

BJP MP Phangnon konyak : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संसदेत वातावरण तापलेलं असतानाच आज संसदेत मोठा राडा झाल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप खासदारांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप करण्यात आलायं. तर भाजपच्या एका महिला खासदाराने आपल्याशी गैरवर्तन केल्याचाही आरोप करण्यात आलायं. खासदार फांगनोन कोन्याक (BJP MP Phangnon konyak ) यांनी हा आरोप केलायं. यासंदर्भात त्यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे तक्रारही केलीयं. त्यामुळे फांगनोन कोन्याक चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

Shankar Mandekar : संग्राम थोपटेंची सत्ता कशी उलथून टाकली? मांडेकरांनी सगळंच सांगितलं..

अमित शाह यांनी संसदेत डॉ. आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याप्रकरणी काँग्रेसकडून आज संसदेबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी अमित शाह राजीनामा द्या, माफी मागा, अशा जोरदार घोषणाबाजी केलीयं. यावेळी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. तर इतरही खासदार होते. या आंदोलनानंतर काँग्रेसच्या खासदारांचा ताफा संसदेकडे वळल्यानंतर पायऱ्यांवरच भाजप खासदार आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसून आलं. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत भाजप खासदार प्रताप सारंगी खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याचं समोर आलंय. याचवेळी राहुल गांधी यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं असल्याचा आरोप कोन्याक यांनी केलायं.

राहुल गांधींवर आरोप करताना कोन्याक म्हणाल्या, संसद परिसरात मकर गेटच्या पायऱ्यांखाली शांततापूर्ण आंदोलन सुरू होते. यावेळी राहुल गांधी माझ्या जवळ आले. यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागले. ते माझ्यावर ओरडले. मी स्वतःचा बचाव करू शकलो नाही असे नाही. पण, त्यांच्या वागण्याने मी खूप नाराज झाले. कोणत्याही महिलेला, विशेषत: नागालँडमधून येणाऱ्या महिलेला अशी वागणूक देऊ नये. मला सभापतींचे संरक्षण हवे असल्याचं कोन्याक यांनी स्पष्ट केलंय.

‘त्या’ गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे; सरपंच खून प्रकरणावर पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या….

तसेच भाजप खासदार फांगनोन कोन्याक यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्याकडे तक्रार केली असून राहुल गांधींनी माझ्याशी गैरवर्तन केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून मी काँग्रेसचा निषेध करत होते. त्यानंतर राहुल गांधी माझ्या अगदी जवळ आले. अचानक ते आरडाओरड करू लागले. आज जे काही घडले ते अतिशय दुःखद आहे. राहुल गांधी यांनी माझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान दुखावला असून मी सभागृहात सुरक्षेची मागणी करत असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.


कोण आहेत खासदार कोन्याक?

फांगनोन कोन्याक या नागालॅंडच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा असून त्या 2022 ला नागालॅंडमधून राज्यसभेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. दिमापूरमधील होली क्रॉस उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं असून दिल्ली विद्यापीठातील दौलत राम महाविद्यलयातून इंग्रजी साहित्यात पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube