‘बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम…’; गृहमंत्री शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया

  • Written By: Published:
‘बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम…’; गृहमंत्री शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया

Ramdas Athawale On Amit Shah : गेल्या काही दिवसांपासून संसदेत संविधानावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल (Babasaheb Ambedkar) कथित टिप्पणी केली होती यावरून इंडिया आघाडीने (India Alliance) रान उठवलं आहे. दरम्यान, शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्यासंदर्भातील विधानावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) प्रतिक्रिया दिली.

मुंबई बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; CM फडणवीसांची घोषणा… 

काँग्रेस जाणीवपूर्वक काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं.

अमित शाहांच्या राज्यसभेतील भाषणाबाबत बोलताना आठवले म्हणाले, माझ्या मते काँग्रेस पक्षाला कोणतीही टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. अमित शाह हे राज्यसभेत संविधानावर बोलत होते. त्यांच्या भाषणाचा अर्थ असा होता की, काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसमुळेच कायदामंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी त्यांचा प्रतिमाही लावली नव्हती. काँग्रेसचे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे होते. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं, हे अमित शाहांना म्हणायचे होते. अमित शाह यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे. यात कोणताही अपमान करण्याचा हेतू नव्हता. मात्र, काँग्रेस मुद्दाम काही ना काही विषय काढून सभागृहाचे कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न करत आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

संन्यास घेतला की दिला? अश्विनच्या अचानक निवृत्तीमुळे अनेक चर्चांना उधाण 

मी आंबेडकरांचा अनुयायी – अमित शाह
अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना कॉंग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांना 1951-52 आणि 1954 मध्ये पराभूत करण्याचे काम कॉंग्रेसनं केलं. भारतरत्न पुरस्काराबाबत बोलायचे झाले तर अनेक वेळा काँग्रेस नेत्यांनी स्वत:ला भारतरत्न पुरस्कार दिला आहे. 1955 मध्ये पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देऊन सन्मानित केले. 1971 मध्ये इंदिरा गांधींनीही स्वतःला भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. मात्र, बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिला नाही. कॉंग्रेसने कायम आरक्षणाला अन् संविधानाला विरोध केला. मी आंबेडकरांचा अनुयायी असून काँग्रेसने माझ्या विधानाचा विपर्यास केला, असंही शाह म्हणाले.

अमित शहांनी राजीनामा द्यावा- मल्लिकार्जुन खर्गे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा देशात उद्रेक होईल. लोक आंदोलन करतील. बाबासाहेबांसाठी आपले प्राण देण्यास अनेक जण तयार आहेत, असं खर्गे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube