मुंबईत तुफान राडा, काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून लाठीचार्ज, जाणून घ्या काय घडलं?
Varsha Gaikwad : लोकसभेत आज काँग्रेस खासदार आणि भाजप खासदारांमध्ये राडा झाला त्यानंतर भाजपकडून (BJP) लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भाजपकडून या प्रकरणानंतर राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राज्यात देखील भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. माहितीनुसार, मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात शिरून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी लाठीचार्ज केला. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काँग्रेसकडून आता भाजपवर टीका करण्यात येत आहे.
माहितीनुसार, काँगेसकडून सोशल मीडियावर फेक व्हिडीओ व्हायरल करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येत होता असा दावा भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला असून काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती.
सोशल मीडियावर काँग्रेसकडून फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. नेहरू गांधींचं नाव संपत चाललंय आणि बाबासाहेबांचं नाव मोठं होतंय म्हणून राहुल गांधींसह काँग्रेसला नैराश्य आलंय असं भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं.
तर दुसरीकडे या प्रकरणात भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यावर माफी मागण्याऐवजी भाजपा गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपाच्या खासदारांनी दादागिरी केली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, ‘जीएसटी’ कर संकलनात येणार सुसूत्रता अन् पारदर्शकता
मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केला, हा सत्तेचा माज असून अशा भ्याड हल्ल्याला काँग्रेस कार्यकर्ते व आंबेडकरी जनता भिक घालत नाही. सरकारने या गुंडांना तातडीने अटक करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.