संसदेत राडा! भाजप खासदारांनीच धक्का दिल्याचं कॅमेऱ्यात कैद; राहुल गांधींनी A To Z सांगितलं
Rahul Gandhi News : भाजपच्या खासदारांनीच संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलायं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, भाजप खासदाराला राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. या धक्काबुक्कीत भाजप खासदाराचं डोकं फुटल्याचं दिसून आलं. या सर्व प्रकरणानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत A To Z माहिती दिलीयं.
राम शिंदे सर त्यांना क्लास कसा…; फडणवीसांच्या टिप्पणीने सभागृहात पिकला हशा
राहुल गांधी म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलायं. त्यांनी संसदेत अपमानजनक वक्तव्य केलं आहे. या विरोधात आम्ही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. त्यानंतर संसदेत प्रवेश करण्यासाठी आम्ही निघालो. त्याचवेळी संसदेच्या पायऱ्यांवर भाजपचे खासदार हातात दांडके घेऊन थांबले होते. त्यांनी आमचा संसदेत जाण्याचा मार्ग अडवला होता. आम्ही संसदेत प्रवेश करीत असताना त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केलायं.
तसेच संसदेचं हिवाळी अधिवेशना सुरु होण्याआधीच युएसमध्ये अदानींची केस आली होती. या मुद्द्यावरुन आम्हाला संसदेत चर्चा करायची होती. मात्र, भाजपने अधिवेशनात पूर्णवेळ या मुद्द्यावरील चर्चा रोखून धरली. अदानी प्रकरणावर कोणतीही चर्चा होऊ नये, असा भाजपचा प्रयत्न होता. त्यानंतरच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपमानजनक विधान केलं. भाजप आणि आरएसएसची विचारधारा संविधान आणि बाबासाहेबांविरोधी असून त्यांचे विचार, योगदान मिटवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या डोक्यात असलेलं त्यांनी सर्वांसमोरच दाखवलं असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक भाष्य केल्याबद्दल आम्ही त्यांनी माफी मागावी, राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. पण त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आंबेडकरांचा अपमान केलायं शाहांनी राजीनामा द्यायला हवा. अदानीच्या मुद्द्याला हे मिटवू पाहत असून अदानीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देश विकत असल्याचंही राहुल गांधींनी स्पष्ट केलंय.
भाजप खासदाराचे आरोप काय?
राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला त्यावेळी मीदेखील खाली कोसळलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि त्यांनी एका खासदाराला धक्का दिल्याचे सारंगी यांनी म्हटले आहे. फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केला.
दरम्यान, डॉ.आंबेडकर यांच्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत संघर्ष पेटला आहे. गुरुवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात भाजप आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची झाली, त्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. प्रताप सारंगी यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.