संसदेत सावरकर, हिंदुत्व अन् राहुल गांधी, महाराष्ट्रात MVA मध्ये फुटीची स्क्रिप्ट रेडी ?
Rahul Gandhi : लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा वीर सावरकरांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या एका प्रश्नाला उत्तर देत विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांना (Veer Savarkar) माफी मागणारा नायक म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी एकदा इंदिरा गांधींना सावरकरांबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितले की, सावरकर इंग्रजांशी सामील झाले होते. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी दिलेल्या या वक्तव्यावरून आता राज्यातील राजकारणावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये (MVA) यावरून मतभेत निर्माण होण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट) (Shivsena) यांच्यात वीर सावरकरांवरून आरोप- प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस आणि शिवसेनामध्ये अनेक मतभेद झाले आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात जागावाटपावरून वाद झाले होते. तर दुसरीकडे भाजप (BJP) देखील हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहे. यातच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वीर सावरकर यांना माफीवीर म्हटल्याने भाजपसह शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीका होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडी फुटणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी
लोकसभेत आज भाजपवर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, तुमचा जर सावरकरांचा मनुस्मृतीवर विश्वास असेल तर ते राज्यघटनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. सावरकरांना संविधानातही भारतीयत्व दिसले नाही असं राहुल गांधी म्हणाले. यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारले की, सावरकरांबद्दल इंदिरा गांधींचे काय मत होते? याला उत्तर देत राहुल गांधी म्हणाले की, मी त्यांना एकदा हे विचारले होते. त्याला उत्तर देताना इंदिरा गांधी म्हणाल्या की, आंदोलनात सगळे तुरुंगात गेले, पण सावरकर तडजोड करणारे निघाले होते, सावरकर घाबरले आणि त्यांनी इंग्रजांची माफी मागितली. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर सभागृहात गदारोळ झाला.
2022 मध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. यावेळी राहुल वीर सावरकरांवर हल्ला करताना दिसले, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आक्षेप घेतला. संजय राऊत यांनी जाहीरपणे सावरकरांचे हिरो असे वर्णन केले होते. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनाची युती तुटणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र त्यानंतर काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात काही बोलणार नाही असा करार झाला होता. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकर यांच्या विरोधात बोलण्याने काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारत लोकशाहीची जननी, संविधान निर्मात्यांच्या कामगिरीबद्दल लोकसभेत PM मोदींकडून सलाम
आगामी मुंबई महानगर पालिका निडवणुकींमुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्यावरून घेरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे देखील सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर शांत बसणार नसल्याने महाविकास आघाडीमध्ये आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.