‘त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते’, श्रीकांत शिंदेंच्या DCM पदाच्या चर्चेंवरून शिंदे गटाचा टोला…
Naresh Mhaske : विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळूनही महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. भाजपचा (BJP) मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता खासदार नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske) भाष्य केलं. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कोणताही संबंध नसल्याचे म्हस्केंनी स्पष्ट केलं. याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला.
50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण; ‘फुलवंती’ने साजरी केली सक्सेस पार्टी
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री होणार या चर्चांविषयी नरेश म्हस्केंना विचारले असता ते म्हणाले की, उपमुख्यमंत्रीपदाासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची जी चर्चा सुरूये, त्यावर आमच्या पक्षात कोणताही चर्चा झाली नाही. श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचं माध्यमांमध्ये बोललं जातय. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले. त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचे होते. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत. ते केंद्रातही मंत्रीपद घेऊ शकले असते, मात्र त्यांनी घेतलं नाही, असं म्हस्के म्हणाले.
Janhvi Kapoor : जान्हवीचं मनमोहक अन् सुंदर रूप, चाहत्यांच्या खिळल्या नजरा…
म्हस्के म्हणाले, महायुती मजबूत आहे. आमच्यात कोणताही मतभेद नाही. यावर काल एकनाथ शिंदे यांनीही स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महायुतीचे नेते जे. पी. नड्डा जो काही निर्णय घेतील त्याला आम्ही सहमत आहोत असे आम्ही आधीच जाहीर केल्याचं म्हस्के म्हणाले.
5 तारखेला शपथविधी…
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीने 235 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 57 तर राष्ट्रवादीने (अजित पवार) 41 जागा जिंकल्या. निकाल येऊन आठवडा उलटला असून महायुतीत कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे अद्याप ठरलं नाही. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित झाल्याची माहिती दिली. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानवर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याच बावनकुळे म्हणाले.