50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण; ‘फुलवंती’ने साजरी केली सक्सेस पार्टी
Phulvanti Movie Team celebrates success party : पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित (Marathi Movie) ‘फुलवंती’ या चित्रपटाने 50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट 50 दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो. ‘फुलवंती’ने (Phulvanti Movie) हा विक्रम करून दाखवला आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर देखील प्रदर्शित झालाय. तिथेही ‘फुलवंती’ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी खास सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अमृता खानविलकर हिने विशेष उपस्थिती दर्शवून या पार्टीला चारचांद लावले. यावेळी प्राजक्ता आणि अमृताने ‘मदनमंजिरी’ या जबरदस्त लावणीवर कमाल सादरीकरणही केले. या सक्सेस पार्टीत सर्वच टीमने हे यश साजरे केले. या चित्रपटाचे संवाद, लेखन आणि दिग्दर्शन अनुक्रमे प्रवीण विठ्ठल तरडे आणि स्नेहल प्रवीण तरडे यांनी केले आहे. तर छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये सांभाळली आहे.
आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट! ‘इलू इलू’…’या’ तारखेला येतोय चाहत्यांच्या भेटीला
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajkta Mali) मागील महिन्यात प्रदर्शित झालेला ‘फुलवंती’ चित्रपट चांगलाच गाजला. प्राजक्ताचा ड्रीम प्रोजेक्टपैकी एक ‘फुलवंती’ आहे. ‘फुलवंती’ चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर देखील रिलीज करण्यात आला. प्राजक्ता माळीने स्वत: यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिलीय.
आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट! ‘इलू इलू’…’या’ तारखेला येतोय चाहत्यांच्या भेटीला
पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली, देखण्या कलाविष्काराने सजलेली ‘फुलवंती’ मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य कलाकृती आहे. सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘फुलवंती’ सिनेमामध्ये प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी हे मुख्य भूमिकेत आहेत. अविनाश आणि विश्वजीत यांनी संगीताची धूरा सांभाळली तर कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी हे चित्रपटाचे निर्माते आहेत.