Video : लोकशाहीची जननी म्हणून भारताची ओळख; लोकसभेतील संविधान चर्चेवर मोदींचं विधान

  • Written By: Published:
Video : लोकशाहीची जननी म्हणून भारताची ओळख; लोकसभेतील संविधान चर्चेवर मोदींचं विधान

PM Modi On Rahul Gandhi : आज लोकसभेत संविधानावरील झालेल्या चर्चेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत भारत लोकशाहीची जननी असं म्हटले आहे.

या चर्चेला उत्तर देत पीएम मोदी म्हणाले की, जगातील अनेक देश स्वतंत्र झाले, संविधान बनले आणि लोकशाहीही अस्तित्वात आली, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, परंतु महिलांना अधिकार देण्यासाठी अनेक दशके गेली, परंतु आपल्या राज्यघटनेने सुरूवातीपासूनचं महिलांना मतदानाचा अधिकार दिला आहे. प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्रस्थानी महिला असतात. एवढेच नव्हे तर, संसदेत महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. मंत्रिमंडळातही महिलांची संख्या वाढत आहे. या सगळ्याची प्रेरणा आपली राज्यघटना आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही वन नेशन वन रेशन कार्डबद्दल (One Nation One Ration Card) बोललो. देशातील गरिबांना मोफत उपचार मिळाले आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांना गरिबीशी लढण्याचे बळ मिळाले. आम्ही वन नेशन वन आयुष्मान कार्ड आणले.असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तर काँग्रेसवर (Congress) निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत लोकशाहीचा गळा घोटला गेला. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंगगृह बनवण्यात आले. जेव्हा आपण संविधानाची 75 वर्षे साजरी करत आहोत, तेव्हा एक आदिवासी महिला भारताच्या राष्ट्रपतीपदावर आहे, हा एक चांगला योगायोग आहे. एवढेच नाही तर आपल्या सभागृहात महिला खासदारांची संख्याही सातत्याने वाढत आहे.

काँग्रेसच्या एका घराण्याने संविधान दुखावण्याची कोणतीही कसर सोडली नाही. संविधान बदलणे ही त्यांची सवय झाली आहे. काँग्रेसने संविधानावर वारंवार हल्ला केला.काँग्रेसने 60 वर्षात 75 वेळा संविधान बदलला असल्याची टीका देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.  1947 ते 1952 पर्यंत तात्पुरती व्यवस्था होती. निवडणुका झाल्या नाहीत. 1952 पूर्वी राज्यसभेची स्थापनाही झाली नव्हती. असे असतानाही 1951 मध्ये निवडून आलेले सरकार नसताना त्यांनी विधेयक आणून राज्यघटना बदलली.  हा संविधान निर्मात्यांचा अपमान होता. असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संसदेत सावरकर, हिंदुत्व अन् राहुल गांधी, महाराष्ट्रात MVA मध्ये फुटीची स्क्रिप्ट रेडी ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube