वसंतदादा पाटील यांच्यानंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता म्हणजे अजितदादा पवार – सुनिल तटकरे

वसंतदादा पाटील यांच्यानंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता म्हणजे अजितदादा पवार – सुनिल तटकरे

Jan Samman Yatra : वसंत दादा पाटलांनंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता कोण असेल तर ते अजित दादा आहेत असं म्हणत रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. (Jan Samman Yatra) तसंच, काही लोक या योजनेवर लोकसभेत बोलत असून त्यावर टीका करतात असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकाही केली. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले आहेत. ते नाशिक येथे जन सन्मान यात्रेत बोलत होते.

अजित पवारांना पुन्हा धक्का, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद पवार गटात करणार प्रवेश

त्यांची जागा दाखवायची

या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवर संपूर्णपणे प्रकाशझोत ठेवण्यात आल्याचं दिसून येतं आहे. दिंडोरी व देवळाली मतदारसंघातील मेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी रक्षाबंधनाचे कार्यक्रम साजरे झाले. दरम्यान, तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका यावेळी केली. जे लोक या योजनेवर टीका करत आहेत त्यांना त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय शांत बसायच नाही असंही ते यावेळी म्हणाले.

देशासाठी पदक जिंकल्याचा आनंदच पण आता; रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरजनं काय सांगितलं?

सर्वकाही गुलाबी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत सर्वकाही गुलाबी दिसून आलं. यात्रेतील वाहनांच्या ताफ्यात गुलाबी रंगाच्या वाहनांनी लक्ष वेधलं. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग वाहनांसाठी वापरण्यात आला. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकारी यांच्यासाठी असलेली व्हॅनिटी वाहनेही गुलाबी रंगाची होती. अजित पवार यांनी आपल्या पोषाखात केलेला बदल याआधीच चर्चेत आला असून, जनसन्मान यात्रेतही त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केलं होतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube