Lok Sabha Election Result: सिंधुदुर्गमध्ये- नारायण राणे तर रायगडात सुनिल तटकरे आघाडीवर, अनंत गीते पिछाडीवर

Lok Sabha Election Result: सिंधुदुर्गमध्ये- नारायण राणे तर रायगडात सुनिल तटकरे आघाडीवर, अनंत गीते पिछाडीवर

Raigad Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. ( Lok Sabha Election Result 2024) यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचे सुरुवातीचे पहिल्या फेरीतील कल हाती आले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मध्ये अजित पवार गटाचे उमेदवार सुनिल तटकरे-(राष्ट्रवादी) 5400 मतांनी आघाडीवर आहेत.

तर शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अनंत गीते (Anant Gite) हे पिछाडीवर आहेत. दरम्यान, तटकरे यांची ही आघाडी कायम राहणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तर सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे हे 1203 मतांनी आघाडीवर आहेत. विद्यमान खासदार विनायक राऊत हे पिछाडीवर आहेत.

मोठी बातमी! वाराणसीमधून नरेंद्र मोदी 6223 मतांनी पिछाडीवर

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे 2024 रोजी मतदान झालं होतं. एकूण 2 हजार 185 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये एकूण 58 टक्के एवढे मतदान झालं होतं. अत्यंत तुल्यबळ ही लढत मानली जात आहे. कारण, 2019 साली देखील याच दोन उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. यावेळी देखील या दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. दिग्गज नेत्यांची या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज