कालच 6 हजार कोटींच्या फाईलवर सही केली, लाडकी बहीण योजना पुढची 5 वर्षे चालेल, अजितदादांचा वादा

कालच 6 हजार कोटींच्या फाईलवर सही केली, लाडकी बहीण योजना पुढची 5 वर्षे चालेल, अजितदादांचा वादा

Ajit Pawar :राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamnatri Ladaki Bahin Yojana) जाहीर करण्यात आली. मात्र, या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकावर (Mahayuti) जोरदार टीका केली. ही योजना बंद पडेल, हा चुनावी जुमला असल्याची टीका विरोधकांनी केली. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मी कालच सहा हजार कोटींच्या फाईलवर सही केली असून महायुतीला पुन्हा आशिर्वाद द्या, ही योजना पुढची ५ वर्षे ही योजना चालेल, हा अजितदादांचा वादा आहे, असा शब्द अजित पवारांनी दिला.

Turbo : थिएटरमध्ये हाऊसफुल्ल प्रतिसादानंतर ‘टर्बो’ सिनेमा आता Ottवर! तारीख लिहून ठेवा 

आम्ही राजे नाहीत तर जनसेवक
राष्ट्रवादी कॉंग्रेसची जन सन्मान यात्रा आजपासून सुरू झाली. या यात्रेच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतील सभेला अजित पवारांनी संबोधित केलं. ते म्हणाले की, माझ्यासाठी जनता हीच देव आहे आणि तुमचं पाठबळ हीच खरी शक्ती आहे. आम्ही महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या. त्यात बजेट करण्यआधी प्रत्येक घटकाचा आवाज, त्यांच्या गरजा ऐकून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जनतेची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत, असं अजित पवार म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये… ‘कराड दक्षिणला’ अतुल भोसलेंनी ओढत आणलंय… 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, माझ्या लाडकी बहिण ही योजना आम्ही तुमच्यासाठी सुरू केली.  माय मावल्या स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करतात. पण, त्यांनाही वाटत असेल कुठंतरी जत्रेत जावं. काहीतरी घ्यावं. महिलांच्या या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजना आणली आहे. आया बहिणींनो, मावलीनो, तुमचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, हा अजितदादांचा वादा आहे. माझ्या माय-माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच मी 6 हजार कोटींच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय, असं अजित पवार म्हणाले.

पुढची पाच वर्ष योजना चालेल…

पुढं अजित पवार म्हणाले की, विरोधकांकडून आमच्यावर टीका केली जातेय की, हा चुनावी जुमला आहे. पण माय मावलींनो मी तुम्हाला सांगतो, ही योजना तात्पुरती नाही. तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशिर्वाद द्या… पुढची 5 वर्षे ही योजना चालेल, हा अजितदादांचा वादा आहे, असा शब्द अजित पवारांनी दिला.

17 ऑगस्टला मिळणार पैसे…
ते म्हणाले, या योजनेसाठी राज्यभरातून सुमारे सव्वा कोटी महिला भगिनींनी अर्ज केलेत. रक्षाबंधन सणापूर्वीच महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3 हजार रुपये देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत, असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube