काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत; निकालाचा दाखला देत PM मोदींनी जागा दाखवली

काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत; निकालाचा दाखला देत PM मोदींनी जागा दाखवली

Pm Narendra Modi On Congress : काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत, असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी लोकसभा निकालाचा दाखला देत काँग्रेसला जागा दाखवलीयं. दरम्यान, लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणानंतर विकासकामांचा लेखाजोखा मांडत मोदींनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केल्याचंच दिसून आलं आहे.

तुम्हाला हे शोभत नाही; मोदींच्या भाषणात गोंधळ घालणाऱ्या राहुल गांधींना ओम बिर्लांनी खडसावले

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 1984 नंतर काँग्रेस लोकसभा निवडणुकीत 250 पेक्षा अधिक जागा जिंकू शकलेली नाही. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस कशीबशी 99 वर येऊन पोहोचलीयं. काँग्रेसला या 99 जागा 100 पैकी नाही तर 543 पैकी मिळाल्या आहेत. काँग्रेसकडून आत्तापर्यंत पराभवाचा विश्वविक्रम सर करण्यात आलायं. एनडीएला हरवलं असं भासवण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न झाला, हे काँग्रेसच्या बालबुद्धीला कळत नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुतांश जागा मित्रपक्षाने जिंकून दिल्या आहेत, काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यावर पवारांचं लक्ष; विधानसभेच्या ‘या’ जागा ‘दादा’गट लढवणार, नाहाटांची माहिती

सभागृहात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी एनडीए सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखाच मांडला आहे. ते म्हणाले, जम्मू काश्मिरात आधी दगडफेक व्हायची, पण आता कलम 370 ची भींत पाडली, तेव्हापासून दगडफेकीच्या घटना बंद झाल्या आहेत. काश्मिरात भारताची घटना आम्ही लागू केली आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी भारत काहीही करु शकतो, हे जगाने ओळखलं आहे. युपीए सरकारच्या काळात तरुण निराश होते. विकासही खुंटला होता, स्वातंत्र्य संग्रामावर जसा विश्वास होता, तसाच विश्वास आजच्या जनतेचा असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय.

मोठी बातमी! केनियामध्ये करविरोधी आंदोलनात 39 जण ठार, भारतीय दुतावासाच्या महत्वाच्या सुचना

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडताना काँग्रेस पक्षावर सडकून टीका करीत होते. यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. मागील वर्षी देशात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यावरुन ‘मणिपूर को न्याय दो’ अशी घोषणाबाजी विरोधी नेत्यांकडून केली जात होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज