लिहून घ्या, इंडिया आघाडी गुजरातेत भाजपला हरवणार; राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज

लिहून घ्या, इंडिया आघाडी गुजरातेत भाजपला हरवणार; राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज

Rahul Gandhi Challenge PM Modi BJP to lose in Gujarat : संसदेचं सध्या अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर ( BJP ) हल्ला करताना दिसत आहे. यावेळी तर जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयावरून राहुल गाधींनी पंतप्रधान मोदी (PM Modi ) यांना थेट भाजपला गुजरातमध्ये हरवण्याचं आव्हान दिलं आहे.

Kalki 2898 AD: परदेशात प्रभासच्या ‘कल्कि’ सिनेमाचा डंका, ‘या’ चार सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, छोट्या व्यापाऱ्यांना कायमचे नष्ट करून त्यांची जागा मोठ्या उद्योगपतींनी घ्यावी. यासाठी भाजपने जीएसटी आणि नोटबंदी केली. मी गुजरातमध्ये गेलो असताना अनेक कापड उद्योजकांशी मी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की, मोठ्या उद्योजपतींना मदत करण्यासाठी सरकारने जीएसटी आणि नोटबंदी केली. नरेंद्र मोदी हे अरबपतींसाठी काम करतात. त्यामुळे यावेळी आम्ही भाजपला गुजरातमध्ये हरवून दाखवू. हे तुम्ही लिहून घ्या. विरोधी पक्ष असलेला इंडिया आघाडी तुम्हाला गुजरातमध्ये हरवणार. असं म्हणत भर लोकसभेत राहुल गाधींनी थेट भाजपला गुजरातमध्ये हरवण्याचं आव्हान दिलं आहे.

भारतीय वंशाच्या डॉक्टरला रिपब्लिकन पक्षात मोठा मान, डोनाल्ड ट्रम्पसाठी बजावणार महत्वाची भूमिका…

याआधीही त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलायं. भाजपवर हल्ला करताना राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान शिवाचे चित्र दाखवत भाजप विरोधात आम्हाला लढण्यास मदत झाली, मात्र दुसरीकडे त्यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते नेहमीच हिंसाचार करतात असं देखील म्हटले आहेत. राहुल गांधी यांच्या विधानावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतला. तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केलीयं.

>‘टंकलेखन’ परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ, MPSC कडून परीक्षा रद्द

यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, मी भाजप, आरएसएस आणि मोदींना हिंसक म्हटले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला नाही. राहुल यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हा मुद्दा गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले, मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही किंवा आरएसएस म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही. असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube