‘टंकलेखन’ परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ, MPSC कडून परीक्षा रद्द

‘टंकलेखन’ परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ, MPSC कडून परीक्षा रद्द

MPSC Typewriting Skill Test : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षा 1 ते 13 जुलै 2024 दरम्यान आयोगाकडून आयोजित करण्यात आली होती मात्र या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने 1 ते 3 जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.  याबाबत सोशल मीडियावर आयोगाकडून माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाकडून लिपिक-टंकलेखक व कर सहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी 1 ते 13 जुलै दरम्यान मुंबईतील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. आज सकाळी मुंबई येथील परीक्षा केंद्रावर टंकलेखन परीक्षेला सुरुवात झाली होती मात्र परीक्षेदरम्यान टंकेलेखन करताना ‘कन्ट्रोल आणि शिप्ट’चे बटन दाबले की संगणक बंद पडत असल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर टीसीएसने (TCS) हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश न आल्याने शेवटी ‘एमपीएससी’च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी 1 ते 3 जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

सप्टेंबर 2023 मध्ये गट-क सेवा पदाच्या 7  हजार 510 जागांसाठी आयोगाकडून जाहिरात देण्यात आली होती आणि त्यानंतर पुणे, नाशिक, मुंबई, अमरावती आणि औरंगाबाद या सहा केंद्रावर आयोगाकडून मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. तर आता आयोगाकडून 1 ते 13 जुलै दरम्यान मुंबईमध्ये लिपिक-टंकलेखक व करसहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने 1 ते 3 जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात म्हणाले की, आम्ही सकाळपासून परीक्षा केंद्रावर उपस्थित होतो. दुर्दैवाने काही तांत्रिक अडचणी आली आहेत.

लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर ‘संचारबंदी’, अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

टीसीएस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत अडचण दूर होईल असे आश्वासन दिले होते मात्र ही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने आजची परीक्षा रद्द करण्यात आली तसेच खबदारी म्हणून 3 जुलैपर्यंतची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube