MPSC ला ‘मॅट’ चा दणका! निकाल देताना नियमांचे उल्लंघन; याद्या पुन्हा जाहीर कराव्या लागणार

MPSC ला ‘मॅट’ चा दणका! निकाल देताना नियमांचे उल्लंघन; याद्या पुन्हा जाहीर कराव्या लागणार

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध पदांच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर केले. मात्र, निकालाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती. या प्रकरणी मॅटने (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) आयोगाला खडेबोल सुनावले. रोजगाराचा प्रश्न आहे तेव्हा आयोगाने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आता मॅटने दिलेल्या आदेशानुसार आयोगाला जोपर्यंत एका उमेदवाराला एक पद मिळत नाही तोपर्यंत याद्या जाहीर कराव्या लागणार आहेत.

महाराष्ट्र गट ब व गट क पूर्व परीक्षा, स्वतंत्र पूर्व परीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर झाला होता. गट ब संयुक्त मुख्य परीक्षा 2023 पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक, राज्य कर निरीक्षक , सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडली. मुख्य परीक्षेच्या जाहिरातीत पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या पदांच्या मुख्य परीक्षा गुणाच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि पसंतीक्रम देण्यात येईल.

मोठी बातमी : MPSC च्या परीक्षा लांबणीवर; तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड

त्यानंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आणि OPTING OUT पर्याय देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. परंतु एकच मुख्य परीक्षा घेऊन देखील पसंतीक्रम न देता स्वतंत्र संवर्ग निहाय निकाल जाहीर करण्यात आले. आयोगाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काही उमेदवारांनी मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मॅटने आयोगाला याबाबत जाब विचारला असता आयोगाकडे यांचे कोणतेही उत्तर नव्हते. आयोगाकडून केवळ शिफारस पत्र शासनाकडे गेले आहेत आता नियम पाळणे कठीण आहे असे उत्तर देण्यात आले.

मॅटने यावर आयोगाला खडे बोल सुनावले आणि प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक आहे. मॅटने आयोगाला पुनरावृत्ती उमेदवार संख्या विचारली असता आयोगाकडून सचिव सुवर्णा खरात यांनी स्वतः मॅटमध्ये उपस्थित राहून माहिती दिली की एकूण 96 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांची नावे दुय्यम निबंधक (SR) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASO) यांच्या यादीत पुनरावृत्ती झाली आहेत. दुय्यम निबंधक (SR), सहायक कक्ष अधिकारी (ASO) आणि राज्यकर निरीक्षक (STI) यांच्या यादीमध्ये 2 उमेदवारांची पुनरावृत्ती केली गेली आहे आणि विक्रीकर निरीक्षक (STI) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASO) यांच्या यादीमध्ये 80 उमेदवारांची आणखी नावे पुनरावृत्ती झाली आहेत.

स्वतःच्या करिअरशी तडजोड करणारा पती अन् कुटुंबाचा पाठिंबा पूजाला MPSC मध्ये यश देणारा ठरला

अशा प्रकारे एमपीएससीने अद्याप जाहीर न केलेल्या सहायक कक्ष अधिकारी (ASO) च्या एकूण 164 उमेदवारांच्या शिफारसी पाहता 96 उमेदवारांची पुनरावृत्ती जी 60 टक्क्यांपेक्षा मोठी संख्या आहे. ही संख्या केवळ शिफारस पात्र ठरत असलेल्या यादीतील आहे. आता मॅटमधून प्राप्त आदेशानुसार आयोगाला जोपर्यंत एका उमेदवाराला एक पद मिळत नाही तो पर्यंत याद्या जाहीर कराव्या लागतील.

24 मे रोजी किंवा त्याआधी आयोगाने दुय्यम निबंधक आणि राज्य कर निरीक्षक पदासाठी निवड झालेले उमेदवार आहेत त्यांना पत्र पाठवून विचारण्यात येईल की कोणतं पद घेणार आहेत आणि कोणतं पद सोडणार आहेत. 30 मे रोजी किंवा पूर्वी सहायक कक्ष अधिकारी पदी निवड झालेल्या उमेदारांना सुद्धा पत्र पाठवून विचारणा आयोग करणार आहे. 4 जून पर्यंत आयोगाला पुन्हा सुधारित याद्या प्रसिद्ध करून शासनाकडे शिफारस करायची आहे. यामध्ये आयोगाने पुन्हा काही नियमबाह्य काम केल्यास 15 जून रोजी पुन्हा दाद मागण्याची मुभा मॅटने उमेदवारांना दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वारंवार होत असलेले नियमबाह्य वर्तन अपेक्षित नाही. सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या या चुका लक्षात येऊन देखील त्यावर योग्य ते उपाय केले जात नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी यात लक्ष देण्याची गरज असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते आझम शेख म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज