स्वतःच्या करिअरशी तडजोड करणारा पती अन् कुटुंबाचा पाठिंबा पूजाला MPSC मध्ये यश देणारा ठरला

स्वतःच्या करिअरशी तडजोड करणारा पती अन् कुटुंबाचा पाठिंबा पूजाला MPSC मध्ये यश देणारा ठरला

MPSC Main Exam 2022 Result : या प्रवासामध्ये माझ्या पतीच्या पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नव्हतं (MPSC Main Exam 2022 Result) माझ्या परीक्षेसाठी त्यांनी एक वर्ष आमचं लग्न पुढे ढकललं. माझ्या करिअरसाठी स्वतःच्या करिअरमध्ये तडजोड केली. ते मला घरातील कामं एकवेळ स्वयंपाक करू नको पण अभ्यास कर असं म्हणत पाठींबा देत होते. अशा भावना व्यक्त केल्या पूजा वंजारी हिने. राज्यातील सर्वात मोठ्या राज्यसेवेच्या (MPSC) परीक्षेचा निकाल गुरूवारी (18 जानेवारीला) जाहीर झाला आहे. 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील (Vinayak Patil) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये पूजा अरुण वंजारी (Pooja Arun Vanjari) हिने 570.25 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. याच पूजा वंजारीच्या यशापर्यंत मजल मारण्याचा प्रवास कसा होता? हे जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीने पूजाशी संवाद साधला. यावेळी तिने आपली ही यशोगाथा शेअर केली आहे.

Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्य सरकारकडूनही सुट्टी जाहीर!

यावेळी पूजाने सांगितलं की, अभ्यास करताना मी उपजिल्हाधिकारी होण्याचा स्वप्न पाहिलं होतं. जे पूर्ण झालं. 2014 ला मी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांचे तयारीला सुरुवात केली. 2015 ला मी माझा पहिला अटेम्प्ट दिला. त्यानंतर आज सातव्या अटेम्प्टला मी यशस्वी झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी माझं बालपण गेलं. तिथेच माझे शिक्षण झालं. त्यानंतर इस्लामपूर या ठिकाणी मी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं. वडील शेतकरी आहेत. मात्र त्यांचा मुलींचे शिक्षणाला प्रचंड पाठिंबा असल्याने आज मी त्यांच्या स्वप्न पूर्ण करू शकले आहे.

५४ लाख नोंदींच्या आधारे तात्काळ जात प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्या, मंत्री विखेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सुरुवातीला तर माझं केवळ इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होतं. पण स्पर्धा परीक्षांबद्दल कळलं त्यानंतर एकच स्वप्न होतं ते म्हणजे आपल्याला उपजिल्हाधिकारी व्हायचं आणि ते देखील पहिल्या रँकने. हे मी एका ठिकाणी लिहून देखील ठेवलं होतं. या दरम्यान माझी 2020 मध्ये माझी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावर आयुक्तालयामध्ये प्रोबेशन पिरियड कम्प्लीट करत आहे.

गोड हास्य, कपाळी टिळा अन् हातात धनुष्य, असा दिसतोय रामललाचा पहिला फोटो

या दरम्यान माझं लग्नही झालं. यामध्ये माझे पती आणि सासरच्या लोकांनी हे मला प्रचंड पाठिंबा दिला. त्याचबरोबर मी कुठल्याही कोचिंग क्लासेस न लावता माझा संपूर्ण अभ्यास घरी केलेला आहे. तसेच हा सातवा अटेम्प्ट असल्याने या अगोदरच्या अपयशांमध्ये मी कधीही खचून न जाता अभ्यास सोडला नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये स्पर्धा प्रचंड असून यश मिळवण्यासाठी सातत्य, जिद्द आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे असतं.

त्यासाठी मी आणि माझी बहीण भाऊ जो इरिगेशनमध्ये असून आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. आम्ही तिघेही मिळवून एका रूमची लायब्ररी बनवून अभ्यास करत होतो. त्याचबरोबर तुम्ही शहरातून आलेले आहात की खेड्यातून आलेल्या आहात याचा कोणताही परिणाम तुमच्या अभ्यासावर आणि यशावर होत नसतो असे यावेळी पूजा मी सांगितलं. तसेच या प्रवासामध्ये माझ्या पतीच्या पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नव्हतं कारण माझ्या परीक्षेसाठी त्यांनी डबल एक वर्ष आमचं लग्न पुढे ढकललं होतं. त्यांनी माझ्या करिअरसाठी त्यांचे करिअरही कॉम्प्रमाईज केलं आहे. तसेच ते मला घरातील कामं एकवेळ स्वयंपाक करू नको पण अभ्यास कर असं म्हणत पाठींबा देत होते. यासर्व गोष्टींमुळएच आपण यशस्वी होऊ शकल्याचं पूजा वंजारी हिने सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज