MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम; मुलींमध्ये पूजा वंजारीने मारली बाजी

  • Written By: Published:
MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर,  विनायक पाटील राज्यात प्रथम; मुलींमध्ये पूजा वंजारीने मारली बाजी

MPSC Main Exam 2022 Result : राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठ्या राज्यसेवेच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील (Vinayak Patil) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये पूजा अरुण वंजारी (Pooja Arun Vanjari) हिने 570.25 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम; मुलींमध्ये पूजा वंजारीने मारली बाजी 

राज्यसेवा मुख्य परीक्षा- 2022 च्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजच उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि आजच एमपीएससीने अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार विनायक पाटील याने 622 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक धनंजय वसंत बांगर याने 608.75 गुण मिळवत तर तिसरा क्रमांक 606.75 गुण मिळवत गावंडे सौरभ केशवराव यांनी पटकावला आहे.

MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम; मुलींमध्ये पूजा वंजारीने मारली बाजी 

मुलांमध्ये पहिले तीन क्रमांक

1. पाटील विनायक नंदकुमार

2. बांगर धनंजय वसंत

3. गावंडे सौरव केशवराव

मुलींमध्ये प्रथम क्रमांक

1. वंजारी पूजा अरुण

2. पाटील प्राजक्ता संपतराव

3. तकभाते अनिता विकास

दरम्यान, आता मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचा पसंतीक्रम द्यायचा आहे. 22 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम ऑनलाइन सूचित करावे लागतील. त्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल, असे एमपीएससीने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज