गोड हास्य, कपाळी टिळा अन् हातात धनुष्य, असा दिसतोय रामललाचा पहिला फोटो

गोड हास्य, कपाळी टिळा अन् हातात धनुष्य, असा दिसतोय रामललाचा पहिला फोटो

Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामललाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) होणार आहे. प्रभू श्री रामाच्या (Lord Sri Ram) पहिल्या दर्शनाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. पण प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी रामललाचा पहिला मनमोहक फोटो समोर आला आहे. मात्र, हे चित्र रामललाला गर्भगृहात बसवण्यापूर्वीचे आहे. चित्रात श्रीरामाच्या चेहऱ्यावर गोड हास्य, कपाळी टिळा आणि हातात धनुष्यबाण दिसत आहेत.

रामललाचा पहिला फोटो कसा आहे?
अजानुभुज- ज्याचे हात लांब लांब आहेत.
शर- बाण
चाप-धनुष्य
धर – हातात धरलेला

रामललाची मूर्ती 51 इंचाची
जेव्हा पहिल्यांदा रामललाच्या मूर्तीचा फोटो समोर आला तेव्हा तो पांढऱ्या कपड्याने झाकलेला होता. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली रामललाची 51 इंचाची मूर्ती गुरुवारी पहाटे मंदिरात आणण्यात आली. प्राणप्रतिष्ठा होत असलेली मूर्ती 5 वर्षांच्या रामललाच्या रुपातील आहे. अरुण योगीराज हे कर्नाटकचे रहिवासी आहेत. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज हे सध्या देशातील सर्वात जास्त प्रसिद्ध शिल्पकार आहेत.

Ram Mandir | करोडो भक्तांची इच्छापूर्ती; श्रीरामांचं पहिलं रूप आलं समोर…

मंत्रोच्चारसह रामलला गर्भगृहात विराजमान
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार पुजारी अरुण दीक्षित यांनी सांगितले की, रामललाची मूर्ती गुरुवारी दुपारी गर्भगृहात स्थापित करण्यात आली आहे. मंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या संस्थेच्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, रामललाच्या मुर्तींना मंत्रोच्चारसह गर्भगृहात स्थापन करण्यात आले.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट उडुपी पेजवर मठाचे विश्वस्त श्री विश्वप्रसन्न तीर्थ यांनी सांगितले की, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उद्घाटनाच्या दिवशी केवळ आमंत्रित पाहुण्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. 22 जानेवारीला राम मंदिरात ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिर जनतेसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

Ram Mandir : ‘मेरे रामलल्ला विराजमान हो गए’ म्हणत पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला श्रीरामांचा फोटो

रामलालचे आसन 3.4 फूट उंच
बुधवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने राम मंदिर परिसरात रामललाची मूर्ती आणण्यात आली. याची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्यांचे आसनही तयार करण्यात आले आहे. रामललाचे आसन 3.4 फूट उंच आहे. ते मकराना दगडाने बनलेले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज