Ram Mandir : ‘मेरे रामलल्ला विराजमान हो गए’ म्हणत पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला श्रीरामांचा फोटो
Ex Pakistani Cricketers tweet on Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात या सोहळ्याची प्रचंड उत्सुकता असताना यादरम्यान आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने (Ex Pakistani Cricketer) देखील राम मंदिराबाबत ट्विट केलं आहे. तसेच त्याने या ट्वीटमध्ये नुकत्याच विराजमान झालेल्या प्रभु श्रीरामांच्या मूर्तीचा फोटोही शेअर केला आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने त्याच्या एक्स एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की. ‘मेरे रामलला विराजमान हो गए’ तसेच यामध्ये त्याने नुकत्याच विराजमान झालेल्या प्रभुशीरामांच्या मूर्तीचा फोटोही शेअर केला आहे. तसेच अशाप्रकारे भारतीय आणि त्यातही राम मंदिरावर कनेरीयाची प्रतिक्रिया देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही त्याने राम मंदिराच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये मॉरिशस सरकारने जेव्हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली होती. त्यावरही प्रतिक्रिया देत कनेरीयाने मॉरिशस सरकारचे आभार मानले होते.
मेरे रामलला विराजमान हो गए 😍 pic.twitter.com/mZX1jpLlT9
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 19, 2024
राम मंदिर उद्घाटनाची तयारी सुरू आहे. येत्या सोमवारी प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा होणार आहे. त्याआधी 16 जानेवारीपासून विविध धार्मिक विधी येथे सुरू आहेत. काल गुरुवारी श्रीराम मूर्ती गर्भगृहात आणण्यात आली. यावेळी विविध प्रकारचे संस्कार आणि पूजन करण्यात आले. काशीवरून आलेल्या पुरोहितांच्या पथकाने विधी केले. यानंतर काल रात्री रामलल्लांचा पहिला फोटो समोर आला. या फोटोत राम मंदिराच्या बांधकामातील कामगार मूर्तीसमोर हात जोडून उभे असलेले दिसत आहेत. हा क्षण त्यांच्यासाठी भारावणारा असाच होता. त्यामुळेच अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले.
Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफची मिस्मॅच 3 सेटवरच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे. राम मूर्ती तयार करण्यासाठी एकाच वेळी तीन मूर्तीकार काम करत होते. त्यात योगीराज यांनी तयार केलेली मूर्ती गर्भगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मूर्ती तयार करण्याच्या कामात योगीराज यांनी स्वतःला अगदी झोकून दिले होते. या काळात त्यांनी मोबाइलही हातात घेतला नाही. कुटुंबियांशीही त्यांचे बोलणे होत नव्हते.
अबब! 60 हजार पदांसाठी तब्बल 50 लाख अर्ज; ‘युपी’ पोलीस भरतीत अर्जांचा पाऊस
दरम्यान, येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ शकतात. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची अंतिम तरिख निश्चित झालेली नाही. राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.
14 जानेवारीला संक्रांतीपासून 10 दिवसांचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे. तसेच कार्यक्रमानंतर कदाचित 24 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर खुलं होणार असल्याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे.