अबब! 60 हजार पदांसाठी तब्बल 50 लाख अर्ज; ‘युपी’ पोलीस भरतीत अर्जांचा पाऊस
UP Police Constable Recruitment 2024 : उत्तर प्रदेशात मोठी पोलीस भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून पोलीस (UP Police Constable Recruitment 2024) कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. सरकारी नोकरी म्हटलं की अर्जांचा पाऊस पडतो. येथेही तसंच झालं. 60 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी तब्बल 50 लाख अर्ज आले आहेत. एकतर पोलीस भरतीसाठी (UP Police) तब्बल 4 वर्षांनंतर अर्ज मागवण्यात आले होते. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 16 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
या भरतीसाठी उत्तर प्रदेश पोलीस भरती बोर्डाने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. यासाठी विभागाच्या uppbpb.gov.in या वेबसाइटवर अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येईल असे सांगण्यात आले. उत्तर प्रदेश पोलीस दलात 60 हजार 224 पुरुष आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी तब्बल 50 लाख 14 हजार अर्ज प्राप्त झाले आहे.
मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल
या भरतीसाठी इतक्या मोठ्या संख्येने अर्ज येतील याचा अंदाज कुणालाही नव्हता. एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार 50 लाख अर्जांमध्ये 15 लाख महिला उमेदवारांचे अर्ज आहेत. म्हणजेच एका एका पदासाठी साधारण शंभर उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे तीव्र स्पर्धा होणार हे निश्चित आहे. या पदांसाठीच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 60 हजार 224 पदांपैकी 12 हजार पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या पदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आल्याने तीव्र स्पर्धा राहणार आहे. पुरूष कॉन्स्टेबल पदांचा विचार केला तर एका पदासाठी जवळपास 83 उमेदवारांत स्पर्धा राहणार आहे. तसेच एक महिला कॉन्स्टेबल पदासाठी 125 उमेदवारांत स्पर्धा राहिल. या पदांसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा होतील असे सांगितले जात आहे. मात्र अजू तारीख जाहीर झालेली नाही. यासंबंधी आवश्यक माहिती विभागाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्राध्यापकाला UPSC चा ध्यास, अपयशानंतर अंगावर थेट वर्दी; IPS संदीप गिल यांचा प्रेरणादायी प्रवास
पोलीस भरतीसाठी मोठ्या संख्येने अर्ज आल्याने परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. उमेदवार परीक्षा देण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यांतही जातील. त्यामुळे वाहतुकीची योग्य व्यवस्था करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रांच्या व्यवस्थेतही बदल करावे लागणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी मुदत संपल्यानंतर आता प्रशासनाने परीक्षा आयोजित करण्यावर सर्व लक्ष केंद्रीत केले आहे.