खळबळजनक : जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या; झोपेत असलेल्या चिमुरड्यांना अंथरुनातच घातल्या गोळ्या

खळबळजनक : जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या; झोपेत असलेल्या चिमुरड्यांना अंथरुनातच घातल्या गोळ्या

देवरिया : उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यात फतेहपूर गावात जमिनीच्या वादातून 6 जणांची निघृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेश शवविच्छेदानासाठी पाठवून दिले असून काही जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. (6 people were brutally murdered over a land dispute in Fatehpur village in Deoria district of Uttar Pradesh)

याबाबत अधिक माहितीत अशी की, सत्य प्रकाश दुबे आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांच्यात अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता. अनेकदा यावरुन त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. प्रेम यादव सतत आपल्या जमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप सत्य प्रकाश करत होते. तर जमीन आपली असल्याचा दावा प्रेम यादव करत होते.

Caste Based Census Report : नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक; जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर

अशात आज (सोमवारी) सकाळी प्रेम यादवचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली. प्रेमचा गळा चिरून खून करण्यात आला होता. ही हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र प्रेम यादवच्या कुटुंबीयांचा संशय सत्य प्रकाश दुबे यांच्यावर आला. त्यानंतर बदला म्हणून प्रेम यादवच्या कुटुंबीयांनी सत्य प्रकाश यांच्या घरावर बंदूक, काठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. सकाळची वेळ होती त्यामुळे सगळे घरी हजर होते.

हृदयद्रावक! गुगल मॅपवर डोळे झाकून विश्वास ठेवणं भोवलं; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर ओढावला मृत्यू

1 हत्येचा संशय अन् 5 जणांची हत्या :

प्रेम यादवच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी सकाळी 8 ते 8 च्या दरम्यान सत्य प्रकाश दुबे यांच्या घरावर हल्ला केला. घरात प्रवेश करताच कुटुंबियांमधील जो कोणी समोर येईल त्याला मारण्यात आले. कुणाचा गळा कापला तर कुणाला थेट गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेत सत्य प्रकाश, त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा अशा एकूण पाच जणांची हत्या करण्यात आली. यावेळी झालेल्या अंधाधुंद गोळीबाराने संपूर्ण परिसर हादरून गेला.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुसऱ्या बाजूला एकाच गावात 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. अनेक पोलिस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी पाचारण करण्यात आला आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचेही आदेश दिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube