हृदयद्रावक! गुगल मॅपवर डोळे झाकून विश्वास ठेवणं भोवलं; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर ओढावला मृत्यू

हृदयद्रावक! गुगल मॅपवर डोळे झाकून विश्वास ठेवणं भोवलं; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर ओढावला मृत्यू

कोच्ची : गुगल मॅपने दाखविवेल्या रस्त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवल्याने केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथुरुथमध्ये दोन डॉक्टरांना प्राण गमवावे (Two doctors died) लागले आहेत. डॉ. अद्वैत (29) आणि डॉ. अजमल (29) अशी या दोघेंची नावे आहेत. मुसळधार पावसात पेरियार नदीला पाणी साचलेला रस्ता समजून ते पुढे गेले आणि कार बुडाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातातून स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कारमधून तीन जणांची सुटका केली. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. (Two doctors died after their car fell into the river Periyar in Kerala’s Kochi in the wee hours of Sunday)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अद्वैत (29) डॉ. अजमल आणि त्यांची प्रेयस तमन्ना (एमबीबीएसची विद्यार्थिनी), डॉ. गजिक थबसीर आणि हॉस्पिटलमधील नर्स जिस्मोन हे सर्वजण गाडीतून प्रवास करत होते. हे सर्व जण कोडुंगल्लूर क्राफ्ट हॉस्पिटलमध्ये काम करायचे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, डॉ. अद्वैत यांचा शनिवारी वाढदिवस होता आणि ते हॉस्पिटलमधील पाच जणांसह वाढदिवसाच्या खरेदीसाठी आणि सेलिब्रेशनसाठी कोचीला गेले होते. तिकडून ते रात्री कोडुंगल्लूरला परतत होते.

विमानात नवजात बाळाला श्वसनाचा त्रास; मराठमोळा IAS अधिकारी 6 महिन्याच्या मुलासाठी ठरला देवदूत

या अपघातातून बचावलेल्या डॉ. गजिक थबसीर यांनी सांगितले की, आम्ही जीपीएस वापरत होतो. मी गाडी चालवत नव्हतो, पण जीपीएस वापरून मार्ग बदलल्यानंतर हा अपघात झाला. पण ही ऍप्लिकेशनची तांत्रिक चूक होती की मानवी चूक होती हे मी खात्रीने सांगू शकत नाही. कोडुंगल्लूर क्राफ्ट हॉस्पिटलचे वरिष्ठ व्यवस्थापक अशोक रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हणण्यानुसार, डॉ. अजमल मूळचे त्रिशूर जिल्ह्यातील होते आणि डॉ. अद्वैत कोल्लमचे होते. याशिवाय बचावलेले डॉ. गजिक थबसीर क्राफ्ट हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागात कार्यरत आहेत. तर तमन्ना पलक्कडमध्ये एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. जिस्मोन हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहेत.

Manipur Violence : सीबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रेमी युगुलाच्या हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

पोलिसांनी सांगितल्यानुसार, डॉ. अद्वैत यांचा मृतदेह कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे तर डॉ. अजमल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला. पावसाळ्यात GPS अल्गोरिदम ड्रायव्हर्सना कमी रहदारीचे रस्ते घेण्यास सुचवतात, पण कमी वर्दळीचे रस्ते नेमहीच सुरक्षित नसतात. याशिवाय, नकाशावर प्रवासाची पद्धत निवडताना, चारचाकी वाहन दुचाकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, असेही आवाहन पोलिसांनी केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube