Manipur Violence : सीबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रेमी युगुलाच्या हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

Manipur Violence : सीबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये; प्रेमी युगुलाच्या हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

Manipur Violence : मणिपुरमध्ये अद्यापही हिंसाचार पेटलेलाच असून एका प्रेमी युगुलाची हत्येप्रकरणी सीबीआयने(CBI) 8 जणांना अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रेमी युगुल घरासोबत पळून गेले होते. मात्र, ते अडकून पडल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. दोघेही कुकी समुदायाच्या परिसरामध्ये अडकल्याचं समोर आलं होतं. जेव्हा हा हिंसाचार तीव्र झाला होता तेव्हा या प्रेमी युगुलाची हत्या कऱण्यात आली होती. मणिपुरमधील परिस्थिती दर्शवणारा हा संतापजनक फोटो नुकताच समोर आला. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.

मणिपुरमध्ये कुकी आणि मीतेई समाजाच्या संघर्षामुळे हिंसाचार उसळला होता. याचदरम्यान 6 जुलै रोजी, 17 वर्षांची मुलगी 20 वर्षीय मुलासोबत पळून गेली, परंतु हे दोघे कुकी प्रभुत्व असणाऱ्या ठिकाणी अडकले. काही लोकांनी त्यांचं अपहरण केलं आणि नंतर हत्या केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे जण अल्पवयीन असल्याचं समजतयं. हिंदूस्तान टाईम्सने याबद्दल वृत्त प्रकाशित केले आहे.

सामंतांचा परदेश दौरा खटकला! ठाकरे म्हणाले, दाव्होसला ट्रॅफिकचे कोन लावायला जाणार का?

या कारवाईनंतर मणिपुरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले, “मला हे सांगण्यास आनंद होत आहे की फिजाम हेमनजीत आणि हिजाम लिंथोइंगम्बी यांचे अपहरण आणि हत्येसाठी जबाबदार असलेल्या काही मुख्य गुन्हेगारांना आज चुराचंदपूर येथून अटक करण्यात आली आहे.” यापुढे ते म्हणाले की, “काही लोकांना वाटत की ते गुन्हा केल्यानंतर कुठेही फरार होऊ शकतात. परंतू, कायद्याचे हात लांब आहेत, त्यातून कुणीही सुटू शकत नाही.” असं ट्विट बिरेन सिंह यांनी केलं आहे.

स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये उच्चायुक्तांना प्रवेश नाकारला, भारताची ब्रिटनकडे व्यक्त केली नाराजी

दोन मुलांच्या मृतदेहाचे फोटो समोर :
दोन महिलांच्या नग्न अवस्थेतील व्हायरल व्हिडिओनंतर आता मैतेई समुदायातील 2 मुलांच्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या घटनेने पुन्हा एकदा मणिपुरात संघर्ष पेटला. या प्रकरणी सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर मणिपुरातच तळ ठोकून असून राज्यात पेटलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, मणिपूर सरकारने २६ जुलै पत्राच्या माध्यमातून पुढे चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपण्याची शिफारस केली होती. गृह मंत्रालयाने २७ जुलै रोजी विवस्त्र महिलांच्या व्हिडिओचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube