Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफची मिस्मॅच 3 सेटवरच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफची मिस्मॅच 3 सेटवरच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Mismatched Season 3: नॅशनल क्रश रोहित सराफने (Rohit Saraf) त्याचा आगामी ‘मिस्मॅच 3’चे (Mismatched Season 3) चित्रीकरण सुरू केले आहे. आता नव्या सीजनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रोहितने त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) चित्रीकरणाची एक झलक शेअर केली आहे आणि शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. रोहित सराफ तिसर्‍यांदा ऋषीच्या भूमिकेत दिसणार आहे.

रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) अभिनीत Netflix ची लाडकी रोमँटिक वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकर्षक कथानकासाठी ही वेब सीरिज ओळखली जाते आणि मनमोहक केमिस्ट्रीबद्दल सगळेच उत्सुक आहेत. मिस्मॅच सीझन 3 चे शूट सुरू झालं असून आता प्रेक्षक या वेब सीरिजची वाट बघत आहेत. रोहितकडेही इश्क विश्क रिबाउंड हा प्रोजेक्ट सुद्धा आहे.

Sangharsyoddha Movie: मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर

युट्यूबर प्राजक्ता कोळी आणि अभिनेता रोहित सराफ यांच्या ‘Mismatched’ या प्रसिद्ध सीरिजचा पहिला सीझन नोव्हेंबर 2020मध्ये प्रसारित झाला होता. या सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजमध्ये रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळीसोबत रणविजय सिंह देखील पाहायला मिळाले होता.

आता जवळपास 2 वर्षांनंतर, मेकर्सनी ‘मिसमॅच’च्या तिसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली आहे. ‘मिसमॅच सीझन 3’बद्दल (Mismatched Season 2) प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आता ही सीरिज लवकरच रिलीज करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज